यशया
धडा 15
मवाबबद्दल ही शापवाणी. एका रात्रीत आर मवाब लुटले गेले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला. एका रात्री सैन्याने कीर मवाब लुटले. त्या रात्री शहराचा नाश केला गेला.
2 राजघराणे व दीबोनमधील लोक गाऱ्हाणे गायला पूजास्थानाला जात आहेत. नबो व मेदबा यांच्यासाठी मवाबचे लोक रडत आहेत. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी सर्वांनी मुंडन केले आहे व दाढी केली आहे.
3 मवाबमधील सर्वांनी घरादारातील सर्वांनी काळे कपडे घातले आहेत व ते रडत आहेत.
4 हेशबोन व एलाले येथील लोक एवढ्यामोठ्याने रडत आहेत की त्यांचा आवाज दूरच्या याहसा शहरापर्यंत ऐकू येत आहे. एवढेच काय पण सैनिकही गर्भगळीत होऊन भीतीने कापत आहेत.
5 मवाबच्या दु:खाने माझे मन रडत आहे. लोक बचावासाठी धावत आहेत. ते दूर सोअर व एगलाथ शलिशीयापर्यंत पळतात. लूहीथच्या चढणीवर ते रडत रडत चढत आहेत. होरोनाइमच्या वाटेवर लोक मोठ्याने आक्रोश करीत जात आहेत.
6 पण निम्रीमाचे पाणी आटले आहे. सर्व झाडेझुडपे वाळली आहेत. कोठेच हिरवेपणा नाही.
7 म्हणून लोक स्वत:ची संपत्ती गोळा करून मवाब सोडतात. ते ही संपत्ती घेऊन वाळुंजच्या खाडीपलीकडे जातात.
8 मवाबमध्ये सगळीकडे रडणे ऐकू येत आहे. लांब असलेल्या एग्लाइममधील लोक रडत आहेत आणि बैर-एलिममध्येही आक्रोश सुरू आहे.
9 दीमोनचेपाणी सक्ताने लालभडक झाले आहे. मी परमेश्वर दीमोनवर आणखी संकटे आणीन, मवाबमधील काही थोडी माणसे शत्रूच्या हातातून निसटली आहेत पण मी त्यांच्यावर त्यांना खाऊन टाकण्यासाठी सिंह पाठवीन.