रोमकरांस

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16


धडा 14

जो विश्वासात दुर्बल आहे त्याचा स्वीकार करा. पण मतभेदावरुन भांडणाच्या हेतूने नव्हे.
2 एखाद्याचा विश्वास असा असतो की, तो सर्व गोष्टी खाऊ शकतो, परंतु दुर्बल मनुष्य भाजीच खातो.
3 जो कोणत्याही प्रकारचे अन्र खातो त्याने जो काही विशिष्ट गोष्टी खात नाही, त्याला तुच्छ मानू नये. आणि जो काही विशिष्ट गोष्टी खातो त्याने त्याला दोष देऊ नये कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे.
4 दुसऱ्याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? त्याच्या मालकाच्या दृष्टीने तो स्थिर राहील किंवा त्याचे पतन झाले असताही स्थिर राहील. कारण त्याला स्थिर करण्यास मालक समर्थ आहे.
5 एखादा मनुष्य एक दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो परंतु दुसरा मनुष्य प्रत्येक दिवस सारखाच मानतो. प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करुन घ्यावी.
6 जो विशेष दिवस पाळतो तो प्रभूचा मान राखण्यासाठी पाळतो आणि जो कोणत्याही प्रकारचे अन्र खातो तो प्रभूचा मान राखण्यासाठी खातो. विशिष्ट प्रकारचे अन्र खात नाही तो प्रभूचा मान ठेवण्यासाठी खात नाही. तो सुद्धा देवाचे आभार मानतो.
7 कारण कोणीही स्वत:साठी जगत नाही, किंवा मरत नाही, जर आपण जगतो तर प्रभुचे लोक म्हणून जगतो आणि मरतो तर प्रभूचे लोक म्हणून मरतो.
8 म्हणून जर आपण जगतो किंवा मरतो तर आपण प्रभूचे आहोत.
9 ख्रिस्त मेला आणि जिवंत झाला यासाठी की त्याने जे आता मेलेले आहेत आणि जे अजूनही जिवंत आहेत त्या दोघांचा प्रभु व्हावे.
10 तेव्हा तू आपल्या बलवान भावाला दोष का लावतो? किंवा जो अशक्त आहे त्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.
11 असे लिहिले आहे की, “प्रभु म्हणतो खात्रीने मी जिंवत आहे प्रत्येक गुडघा माझ्यासमोर टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ देवाचे उपकार मानील.” यशया 45:23
12 म्हणून प्रत्येक जण आपापल्यासंबंधी देवाला हिशेब देईल.
13 म्हणून आपण एकमेकांचा न्याय करण्याचे थांबवू या. तुम्ही असा निश्चय करावा की, तुम्ही आपल्या भावाच्या मार्गात पाप करण्यासाठी मोह किंवा अडखळण ठेवणार नाही.
14 मला माहीत आहे आणि मी जो प्रभु येशूमध्ये आहे त्या माझी खात्री झाली आहे की, जो पदार्थ खाण्यास अशुद्ध आहे असे समजतो त्याशिवाय कोणताही पदार्थ मूळचा अशुद्ध नाही. त्याच्यासाठी ते अशुद्ध आहे.
15 जर खाण्यामुळे तुझा भाऊ दु:खी झाला आहे तर तू प्रीतीने वागत नाहीस. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्राने नाश करु नकोस.
16 म्हणून तुम्हांसाठी जे चांगले आहे त्याची निंदा होऊ नये.
17 खाणे पिणे यात देवाचे राज्या नाही. परंतु नीतिमत्व, शांति आणि आनंद, जो पवित्र आत्म्यात आहे त्यामध्ये आहे.
18 जो कोणी अशा प्रकारे जगून ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला आनंद देणारा आणि सर्व लोकांनी पसंत केलेला असा आहे.
19 तर मग आपण शांतीला आणि एकमेकांच्या वाढीला मदत करणाऱ्या गोष्टींच्या मागे लागावे.
20 तुम्ही खाता त्या अन्रामुळे देवाच्या कार्याचा नाश करु नका. सर्व गोष्टी शुद्ध आहेत. असंतोषाने खाणे मनुष्यासाठी चुकीचे आहे.
21 मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे, तुझा भाऊ न अडखळेल असे करणे चांगले आहे.
22 तुझा जो विश्वास आहे तो देवासमोर तुझ्या ठायी असू दे. ज्याला योग्य आहे असे वाटते व त्यामुळे जो स्वत:चा द्वेष करीत नाही तो धन्य.
23 जर तो पुढे जाऊन आपण हे टाळावे असा विश्वास ठेवूनखातो तो देवासमोर दोषी ठरतो. कारण त्याची कृति विश्वासावर आधारित नाही, ते पाप आहे.