लूक
धडा 3
तिबिर्य कैसराच्या कारकीर्दीच्या पंधराव्या वर्षी, जेव्हा पंतय पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता, आणि हेरोद गालीलचा अधिकारी असताना, आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती या देशांचा अधिकारी होता व लूसनिय हा अबिलेनेचा अधिकारी होता.
2 हनन्या व केफा हे मुख्य याजक होते, तेव्हा वाळवंटात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले.
3 तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात गेला, व लोकांना त्यांच्या पापांपासून क्षमा मिळण्यासाठी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घेण्याविषयी घोषणा करीत फिरला.
4 हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे झाले:“वाळवंटात कोणाचा तरी आवाज ऐकू आला, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याचे रस्ते सरळ करा.
5 प्रत्येक दरी भरुन येईल, आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल वाकड्यातिकड्या जागा सरळ केल्या जातील ओबडधोबड रस्ते सपाट केले जातील
6 आणि सर्व लोक देवाचे तराण पाहतील!”‘
7 त्याच्याकडून बाप्तिस्मा करुन घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला: “अहो, सापाच्या पिल्लांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करुन घेण्यासाठी तुम्हांला कोणी सावध केले?
8 पश्चात्तापास योग्य असे फळ द्या, आणि आपापसात असे म्हणू नका की, ‘आमच्यासाठी अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ मी तुम्हांला सांगतो की, अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव या खडकांचा उपयोग करण्यास समर्थ आहे.
9 आणि झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड अगोदरच ठेवलेली आहे. आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून आगीत टाकले जाईल.”
10 जमावाने त्याला विचारले, “मग आता आम्ही काय करावे?”
11 त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन सदरे असतील त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला ते वाटून द्यावे. ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”
12 काही जकातदारही बाप्तिस्मा करुन घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”
13 तो त्यांना म्हणाला, “गरजेपेक्षा जास्त जमा करु नका.” हेच तुम्हांला सांगितले आहे.
14 काही शिपायांनीसुद्धा त्याला विचारले, “आणि आम्ही काय करावे?”योहान त्यांना म्हणाला, “कोणाकडून बळजबरीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करु नका. आणि तुम्हांला मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”
15 लोक मशीहाची अपेक्षा करीत होते. आणि ते सर्व त्यांच्या मनामध्ये योहानाबद्दल आश्चर्य करीत होते व असा विचार करीत होते की, “कदाचित तो ख्रिस्त असण्याची शक्यता आहे.”
16 त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले; तो म्हणाला. “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील.
17 त्याचे खळे स्वच्छ करण्यासाठी व त्याच्या कोठारात गहू साठविण्यासाठी त्याच्या हातात त्याचे सूप आहे पण भुसा तो न विझविता येणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”
18 योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करुन सुवार्ता सांगितली.
19 योहानाने हेरोद या सताधीशाची कानउघडणी केली. कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नीशी-हेरोदीयाशी अनैतिक संबंध होते, तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या.
20 हे सर्व करुन सुद्धा त्यात भर म्हणून की काय त्याने योहानाला तुरुंगात टाकले.
21 तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा केला जात होता, तेव्हा येशूचा सुद्धा बाप्तिस्मा झाला. तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले.
22 आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रुपात त्याच्यावर उतरला आणि आकाशातून एक वाणी आली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुइयाविषयी फार संतुष्ट आहे.”
23 जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोकांना असे वाटे की, येशू योसेफाचा मुलगा आहे. योसेफ एलीचा मुलगा होता
24 एली मत्ताथाचा मुलगा होता, मत्ताथ लेवीचा मुलगा होता. लेवी मल्खीचा मुलगा होता. मल्खी यन्रयाचा मुलगा होता. यन्रया योसेफाचा मुलगा होता.
25 योसेफ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य अमोसाचा मुलगा होता. अमोस नहूमाचा मुलगा होता. नहूम हेस्लीचा मुलगा होता. हेस्ली नग्गयाचा मुलगा होता.
26 नग्गय महथाचा मुलगा होता. महथ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य शिमयीचा मुलगा होता. शिमयी योसेखाचा मुलगा होता. योसेख योदाचा मुलगा होता.
27 योदा योहानानाचा मुलगा होता. योहानान रेशाचा मुलगा होता. रेशा जरुब्बाबेलाचा मुलगा होता. जरुब्बाबेल शल्तीएलाचा मुलगा होता. शल्तीएल नेरीचा मुलागा होता.
28 नेरी मल्खीचा मुलगा होता. मल्खी अद्दीचा मुलगा होता. अद्दी कोसोमाचा मुलगा होता. कोसोम एल्मदामाचा मुलगा होता. एल्मदाम एराचा मुलगा होता.
29 एर येशूचा मुलगा होता. येशू अलिएजराचा मुलगा होता. अलिएजर योरीमाचा मुलगा होता. योरीम मत्ताथाचा मुलगा होता. मत्ताथ लेवीचा मुलगा होता.
30 लेवी शिमोनाचा मुलगा होता. शिमोन यहूदाचा मुलगा होता. यहूदा योसेफाचा मुलगा होता. योसेफ योनामाचा मुलगा होता. योनाम एल्याकीमाचा मुलगा होता.
31 एल्याकीम मल्लयाचा मुलगा होता. मल्ल्या मिन्नाचा मुलगा होता. मिन्ना मत्ताथाचा मुलगा होता. मत्ताथ नाथानाचा मुलगा होता. नाथान दाविदाचा मुलगा होता.
32 दावीद इशायाचा मुलगा होता. इशाय ओबेदाचा मुलगा होता. ओबेद बवाजाचा मुलगा होता. बवाज सल्मोनाचा मुलगा होता. सल्मोन नहशोनाचा मुलगा होता.
33 नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता. अम्मीनादाब अर्णयाचा मुलगा होता. अर्णय हेस्रोनाचा मुलगा होता. हेस्रोन पेरेसाचा मुलगा होता. पेरेस यहूदाचा मुलगा होता.
34 यहूदा याकोबाचा मुलगा होता. याकोब इसहाकाचा मुलगा होता. इसहाक अब्राहामाचा मुलगा होता. अब्राहाम तेरहाचा मुलगा होता. तेरह नाहोराचा मुलगा होता.
35 नाहोर सरुगाचा मुलगा होता. सरुग रऊचा मुलगा होता. रऊ पेलेगाचा मुलगा होता. पेलेग एबराचा मुलगा होता. एबर शेलहाचा मुलगा होता.
36 शेलह केनानाचा मुलगा होता. केनान अर्पक्षदाचा मुलगा होता. अर्पक्षद शेमाचा मुलगा होता. शेम नोहाचा मुलगा होता. नोहा लामेखाचा मुलगा होता.
37 लामेख मथुशलहाचा मुलगा होता. मथुशलह हनोखाचा मुलगा होता. हनोख यारेदाचा मुलगा होता. यारेद महललेलाचा मुलगा होता. महललेल केनानाचा मुलगा होता.
38 केनान अनोशाचा मुलगा होता. अलोश शेथाचा मुलगा होता. शेथ आदामाचा मुलगा होता. आदाम देवाचा मुलगा होता.