जमीन हक्क


 • तर उठून जा व या तुझ्या प्रदेशातून फिरुन ये; हा सर्व प्रदेश मी आता तुला देत आहे.”
  उत्पत्ति 13:17
 • “जमीन खरोखर माझी आहे; म्हणून ती तुम्हाला कायमची विकता येणार नाही; तुम्ही परके व उपरी म्हणून माझ्या आश्रयाला आला आहा;
  लेवीय 25:23
 • जेथे जेथे तुम्ही पाय ठेवाल ती जमीन तुमची होईल. दक्षिणेतील वाळवंटापासून उत्तरेला लबानोन पर्यंत आणि पूर्वेला फरात नदीपासून पश्चिमेला समुद्रापर्यंत एवढा प्रदेश तुमचा होईल.
  अनुवाद 11:24
 • परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे म्हणून त्याने मला सोडवले. मला त्याने सुरक्षित स्थळी नेले.
  2 शमुवेल 22:20
 • जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी होतील.
  स्तोत्रसंहिता 2:8
 • नंतर त्यांनी परमेश्वराला मदती साठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले. देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला.
  स्तोत्रसंहिता 107:6, 7
 • नंतर, जर तुम्ही चुकलात आणि चुकीच्या मार्गाने गेलात (डावीकडे वा उजवीकडे) तर तुमच्या मागून आवाज येईल, “हा मार्ग बरोबर आहे. तुम्ही ह्या मार्गाने जावे.”
  यशया 30:21
 • “मागा म्हणजे तुम्हांला ते देण्यात येईल. शोधा आणि तुम्हांला ते सापडेल, ठोका आणि तुमच्यासाठी दार उघडले जाईल,
  मत्तय 7:7
 • जेव्हा देवाने अब्राहामाला पाचारण केले तेव्हा विश्वासानेच त्याने आज्ञापालन केले. आणि त्याला वतन म्हणून जी जागा मिळणार होती त्या जागेकडे तो गेला. आपण कोठे जात आहोत हे त्याला ठाऊक नसतानादेखील तो बाहेर पडला.
  इब्री लोकांस 11:8
 • “मी सतत तुझ्याबरोबर आहे आणि तू ज्या ज्या ठिकाणी जाशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझे रक्षण करीन आणी तुला या देशात परत आणीन; मी हे माझे वचन पूर्ण करीपर्यंत तुला अंतर देणार नाही.”
  उत्पत्ति 28:15
 • देव म्हणाला, “मी एका दूताला तुमच्याकडे पाठवीत आहे तो तुमच्यापुढे चालून, मी तुमच्यासाठी जे ठिकाण तयार केले आहे तेथे तुम्हांस घेऊन जाईल; तो तुमचे संरक्षण करील.
  निर्गम 23:20
 • तेव्हा तू आता खाली जा आणि मी सांगतो तेथे लोकांना घेऊन जा; माझा दूत तुजपुढे चालेल व तुला मार्ग दाखवील जेव्हा पाप केलेल्या लोकांना शिक्षा करण्याची वेळ येईल तेव्हा त्यांना शिक्षा केली जाईल.”
  निर्गम 32:34
 • परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत:तुझ्या बरोबर येईन व तुला विसावा देईन.”
  निर्गम 33:14
 • तुम्ही आत याल आणि बाहेर जाल तेव्हा तुम्हाला सदासर्वकाळ परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल.
  अनुवाद 28:6
 • ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करत होते. ख न देण्याची ताकीद दिली. ख देऊ नका. माझ्या संदेष्ट्यांचे काही वाईट करु नका.”
  स्तोत्रसंहिता 105:13-15
 • ते संकटात सापडले म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटापासून वाचवले. देवाने वादळ थांबवले. त्याने लाटांना शांत केले. समुद्र शांत झाला म्हणून खलाशी आंनदित झाले. देवाने त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी आणून पोहोचवले.
  स्तोत्रसंहिता 107:28-30
 • परमेश्वरा तुला जाण्या - येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.
  स्तोत्रसंहिता 121:8
 • परमेश्वरा, मी जर पूर्वेकडे, जिथे सूर्य उगवतो तिथे गेलो तर तिथे ही तू असतोस. मी जर पश्चिमेकडे समुद्रावर गेलोतर तिथे ही तू असतोस. तिथेही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरुन नेतोस.
  स्तोत्रसंहिता 139:9, 10
 • “कोरेश, तुझ्या सैन्याच्या पुढे मी चालीन. मी डोंगर भुईसपाट करीन. मी वेशीचे जस्ताचे दरवाजे मोडीन. त्यावरील लोखंडी सळ्या तोडीन. तुला मी अंधारातून वाचविणारी संपत्ती देईन. मी तुला गुप्त धन देईन. मीच परमेश्वर आहे, हे तुला कळावे म्हणून मी हे करीन. मी इस्राएलचा देव आहे, व मी तुला नावाने हाका मारत आहे.
  यशया 45:2, 3
 • “म्हणून त्या लोकांना पुढील गोष्टी सांग; परमेश्वर, आमचा प्रभू, म्हणतो, ‘मी माझ्या लोकांना दूरच्या देशांत सक्तीने घालविले, हे खरे आहे. मी त्यांना पुष्कळ देशांत विखुरले, त्या देशांतील मुक्कामाच्या अल्पकाळात मीच त्यांचे मंदिर होईन.”
  यहेज्केल 11:16