भूत प्रतिकार
- नंतर पक्ष्चिमेकडील लोक घाबरतील आणि परमेश्वराला मान देतील. पूर्वेकडचे लोक घाबरतील आणि देवाच्या गौरवांचा आदर करतील. देवाने सोडलेल्या झंझावातामुळे, वेगाने वाहणाऱ्या नदीप्रमाणे, देव जलद गतीने येईल.
यशया 59:19 -
येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ बोलाविले, आणि त्याने त्यांना भुते घालविण्याचा अधिकार दिला. तसेच प्रत्येक आजार व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला.
मत्तय 10:1 -
मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधून ठेवशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.
मत्तय 16:19 -
परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले, अरे सैताना माझ्यापुढून निघून जा. देवाच्या गोष्टीविषयी तुला काही वाटत नाही. तुझे लक्ष देवाच्या गोष्टीकडे लागलेले नाही, तर फक्त मानवाच्या दृष्टिकोणातून महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टीकडे आहे.”
मार्क 8:33 -
येशूने बारा शिष्यांना एकत्र बोलाविले, आणि त्याने त्यांना सर्व भुतांवर सामर्थ्य व अधिकार दिला. आणि त्यांना त्याने रोग बरे करण्याचे सामर्थ्य दिले.
लूक 9:1 -
ते बहात्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभु, तुझ्या नावाने भुतेसुद्धा आम्हांला वश होतात!”
लूक 10:17 -
ऐका मी तुम्हांला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा अधिकार दिला आहे. व मी तुम्हांला शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे. आणि कशानेच तुम्हांला अपाय होणार नाही.
लूक 10:19 -
ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत. उलट, त्यांच्यामध्ये दैवी शक्ति आहे ज्यामुळे शत्रूचे बुरुज नष्ट होतात. आम्ही वाद आणि जे देवाविषयीच्या ज्ञानाविरुद्ध उभे राहते ते नष्ट करतो आणि प्रत्येक विचार पकडून त्याला ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला लावतो.
2 करिंथकरांस 10:4, 5 -
तुमचा पराभव करण्याची सैतानाला संधी देऊ नका.
इफिसकरांस 4:27 -
शेवटी, प्रभूमध्ये तुम्ही त्याच्या महान शक्तीसामर्थ्याने सशक्त व्हा. देवाने दिलेले संपूर्ण चिलखत धारण करा. यासाठी की तुम्हांला सैतानाच्या दुष्ट योजनांविरुद्ध उभे राहता यावे.
इफिसकरांस 6:10, 11 -
माझ्या मुलांनो, तुम्ही देवाचे आहात, म्हणून तुम्ही ख्रिस्तविरोध्याच्या अनुयायांना जिंकले आहे, कारण जगामध्येजो सैतान आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे.
1योहान 4:4 -
सावध आणि जागरुक असा. तुमचा वैरी जो सैतान तो गर्जना करीत फिरणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून सगळीकडे फिरत असतो. त्याचा विरोध करा आणि तुमच्या विश्वासात खंबीर राहा. कारण तुम्हाला माहीत आहे की, जगभर असलेल्या बंधूभगिनींना अशाच प्रकारचे दु:ख सहन करावे लागले, जसे तुम्ही सध्या अनुभवीत आहात.
1 पेत्र 5:8, 9 -
जोपापमय जीवन जगतच राहतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान सुरुवातीपासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्टकरावी या उद्देशानेच देवाचा पुत्र प्रकट झाला.
1योहान 3:8