विवाह आणि लैंगिक
-
तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली. आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडचाने बंद केली. तेव्हा ती मांसाने भरुन आली. परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. 2तेव्हा आदाम म्हणाला,“आता ही मात्र माझ्यासारखी आहे. तिची हाडे माझ्या हाडा पासून व तिचे शरीर माझ्या शरीरापासून बनवले आहे. मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो. कारण ती नरापासून बनवलेली आहे.” म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील.
उत्पत्ति 2:21-24 -
आदाम आणि त्याची बायको हव्वा यांचा लैगिक संबंध आला; हव्वा गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव काइन असे ठेवले.तेव्हा हव्वा म्हणाली, “परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुषसतांन लाभले आहे.” ....आदाम पुन्हा पत्नीजवळ गेला. आणि तिला मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव शेथ असे ठेवले हव्वा म्हणाली, “काइनाने हाबेलास ठार केले म्हणून देवाने मला दुसरा मुलगा दिला.”
उत्पत्ति 4:1, 25 -
अब्रामाची बायको साराय हिला फारोने नेले म्हणून परमेश्वराने फारो व त्याच्या घरातील लोकाना भयंकर रोगाची पीडा भोगावयास लावली. तेव्हा फारोने अब्रामास बोलावले. तो म्हणाला. “तू माझ्याबाबत फार वाईट गोष्ट केलीस, साराय तुझी बायको आहे, हे तू मला सांगितले नाहीस का?
उत्पत्ति 12:17-18 -
अब्राम व त्याची बायको साराय यांना मुलबाळ नव्हते. साराय हिची हागार नावाची एक मिसरी म्हणजे मिसर देशाची एक दासी होती. साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून रोखले आहे तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा, तिच्यापोटी जन्मलेले मूल माझेच मूल आहे असे समजून मी ते स्वीकारीन.”अब्रामाने आपली बायको साराय हिचे म्हणणे मान्य केले. कनान देशात अब्राम दहा पर्षे राहिल्यावर हे झाले आणि सारायने आपली मिसरी मोलकरीण हागार आपला नवरा अब्राम याला बायको म्हणून दिली.
उत्पत्ति 16:1-3 -
मग परमेश्वर म्हणाला, “मी पुढल्या वसंत ऋ तूत येईन त्या वेळी तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.”सारा तंबूच्या तोंडाशी उभी राहून कान देत होती म्हणून या गोष्टी तिने ऐकल्या. अब्राहाम व सारा वयाने फार म्हातारे झाले होते. साराचे मुले होण्याजोगे वय निघून गेले होते. म्हणून साराने जे ऐकले त्यावर विश्वास ठेवला नाहीं. ती स्वत:शीच हसून म्हणाली, “मी म्हातारी झाली आहे, आणि माझा नवराही म्हातारा झाला आहे मी इतकी म्हातारी झाली आहे की आता मला मूल होणे शक्य नाही.”
उत्पत्ति 18:10-12 -
आपल्या भावाजयीपाशी निजल्यावर ह्या मीलनातून होणारी मुले आपले नाव धारण करुन चालणार नाहीत हे ओनानला माहीत होते म्हणून जेव्हा तो त्याच्या भावजयीपाशी निजे तेव्हा तो आपले वीर्य बाहेर जमिनीवर पाडत असे. परंतु त्याच्या हया वागण्याचा परमेश्वराला राग आला, म्हणून त्याने ओनानलाही मारुन टाकले.
उत्पत्ति 38:9-10 -
“व्यभिचार करु नकोस.
निर्गम 20:14 -
“तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरु नकोस; त्याच्या बायकोचा लोभ धरु नकोस; त्याचा गुलाम, त्याची स्त्री गुलाम, बैल, गाढव किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरु नकोस.”
निर्गम 20:17 -
तू तुझ्या सावत्र आईशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाचीलाज जाईल. ..“तू आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवू नको. त्यामुळे तू अमंगळ होशील!
लेवीय 18:8, 20 -
“जो माणूस आपल्या शेजाऱ्याच्या बायकोपाशी जातो तो माणूस व ती स्त्री, ती दोघेही व्यभिचाराच्या पापाचे अपराधी आहेत; त्या जाराला व जारिणीला अवश्य जिवे मारावे. ...“एखाद्या पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते भयंकर पाप त्या दोघांनी केले आहे म्हणून त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथीं राहील.
लेवीय 20:10, 13 -
याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला, वेश्येला, किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली बायको करुन घेऊ नये.
लेवीय 21:7 -
“त्याने कुमारिकेशीच लग्न करावे, भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने बायको करुन घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारिकेशीच लग्न करावे.
लेवीय 21:13-14 -
तेव्हा द्वेषासंबंधी हा नियम आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध जर पाप केले तर तू ही अशी कारवाई करावी. किंवा एखाद्या पुरुषाने आपल्या बायकोने आपल्या विरुद्ध पाप केले आहे असा संशय व द्वेष, धरला तर त्या माणसाने अशी कारवाई करावी; याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे व सांगितलेल्या नियमाप्रमाणे तिच्याविरुद्ध कारवाई करावी.
गणना 5:29-30 -
“एखाद्या माणसाला लग्न केल्यावर बायकोशी शरीरसंबंध ठेवल्यावर काही काळानंतर बायको आवडेनाशी झाली आणि “मी या बाईशी लग्र केले पण ती कुमारी नसल्याचे आमच्या शरीरसंबंधाच्या वेळी मला आढळून आले’ असा खोटा आरोप त्याने तिच्यावर ठेवला तर लोकांमध्ये तिची बदनामी होईल. अशा वेळी त्या मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याचा पुरावा घेऊन गावच्या चावडीवर वडीलधाऱ्या पंचाकडे जावे. ‘मी या पुरुषाशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. पण आतां ती त्याला नकोशी झाली आहे. त्याने तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. आणि हा म्हणतो की कौमार्याची लक्षणे तिच्या ठायी आढळली नाहीत. पण हा घ्या माझ्या मुलीच्या कौमार्याचा पुरावा,’ असे मुलीच्या वडलांनी नेथे सांगून, त्या मंडळींना ती चादर दाखववावी.
अनुवाद 22:13-17 -
“एखाद्याला लग्नानंतर आपल्या बायकोच्या संबंधाने एखादी न आवडणारी गुप्त गोष्ट कळली व ती त्याला आवडेनाशी झाली तर त्याने तिला घटस्फोट लिहून द्यावा. मग तिला घराबाहेर काढावे.
अनुवाद 24:1 -
दावीदाने मग आपली बथशेबा हिचे सांत्वन केले. तिच्याशी त्याने शरीर संबंध केला. बथशेबा पुन्हा गरोदर राहिली. तिला दुसरा मुलगा झाला. दावीदाने त्याचे नाव शलमोन ठेवले. शलमोनावर परमेश्वराचा लोभ होता.
2 शमुवेल 12:24 -
अबीयाचे सामर्थ्य मात्र वाढले. त्याने चौदा बायका केल्या. त्याला बावीस मुलगे आणि सोळा मुली झाल्या.
2 इतिहास 13:21 -
घरी तुझी बायको सुफलीत द्राक्षवेलीसारखी असेल. मेजाभोवती तुझी मुले तू लावलेल्या जैतूनाच्या झाडांसारखी असतील.
स्तोत्रसंहिता 128:3 -
म्हणून तुझ्या बायकोबरोबर सुखी राहा. तरुणपणी जिच्याबरोबर लग्न केलेस तिलाच उपभोग. ती सुंदर हरिणीसारखी आहे. गोजिरवाण्या हरिणाच्या पाडसासारखी आहे. तिचे प्रेम तुझे समाधान करो. तू तिच्या प्रेमात बंदीवान हो.
नीतिसूत्रे 5:18-19 -
दुसऱ्या माणसाच्या बायकोबरोबर झोपणाऱ्याचेही असेच होते. त्या माणसाला दु:ख भोगावे लागते.
नीतिसूत्रे 6:29 -
पण जो माणूस व्यभिचाराचे पाप करतो तो मूर्ख असतो. तो स्वत:चा नाश करीत असतो. तो स्वत:च त्याच्या नाशाला कारणीभूत असतो.
नीतिसूत्रे 6:32 -
जर तुम्हाला बायको मिळाली, तर तुम्हाला चांगली गोष्ट मिळाली असे होईल. परमेवर तुमच्यावर खुश आहे असे ते दर्शवते.
नीतिसूत्रे 18:22 -
लोकांना त्यांच्या आई-वडिलांकडून घरे आणि पैसा मिळतो. पण चांगली बायको परमेश्वराकडून मिळालेला नजराणा आहे.
नीतिसूत्रे 19:14 -
सतत वाद घालणाऱ्या बायकोबरोबर घरात राहाण्यापेक्षा घराच्या छतावर राहाणे अधिक चांगले.
नीतिसूत्रे 21:9 -
प्रेम असलेल्या पत्नीबरोबर आयुष्य आनंदात घालवा. तुमच्या छोट्याशा आयुष्यातील प्रत्येक दिवसाचा आनंद लुटा. देवाने तुम्हाला पृथ्वीवर छोटे आयुष्य दिले आहे आणि फक्त तेव्हढेच तुमच्याकडे आहे हे जाणून या आयुष्यात तुम्हाला जे काम करायचे आहे त्याचा आनंद लुटा.
उपदेशक 9:9 -
चुंबनांनी मला झाकून टाक कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे.
गीतरत्न 1:2 -
माझ्या सख्याचा डावा बाहू माझ्या मस्तकाखाली आहे आणि त्याच्या उजव्या बाहूने त्याने मला धरले आहे.
गीतरत्न 2:6 -
तुझी वक्षस्थळे कमलपुष्पांत चरत असलेल्या जुळ्या हरिणश्रावकासारखी आहेत, मृगीच्या जुळ्या पाडसासारखी आहेत. ..माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू मला उद्दीपित बनवतेस. फक्त तुझ्या एका डोळ्याने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने तू माझे हृदय चोरले आहेस. माझ्या प्रिये, माझ्या वधू तुझे, प्रेम फार सुंदर आहे. तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे.
गीतरत्न 4:5, 9, 10 -
स्त्रिये, सुखी हो. तुला मुले नाहीत. पण तू सुखी असावेस. परमेश्वर म्हणतो, “एकट्या असणाऱ्या बाईला.नवरा असणाऱ्या बाईपेक्षा जास्त मुले होतील.”
यशया 54:1 -
“तुम्ही लोक विश्वासघातकी आहात. पण माझ्याकडे परत या.” हा परमेश्वराचा संदेश होता.“मी तुमचा प्रभू आहे मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे घेईन आणि तुम्हाला सियोनला आणीन.
यिर्मया 3:14 -
परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो, “तू पैसा खर्च केलास आणि तुझ्या प्रियकरांना आणि घाणेरड्या देवांना तुझे नग्न शरीर पाहू दिलेस, तुझ्याबरोबर व्याभिचार करु दिलास. तुझ्या मुलाना ठार मारुन त्यांचे रक्त खोट्या देवांना भेट म्हणून दिलेस. म्हणून मी तू ज्यांच्यावर प्रेम केलेस, त्या तुझ्या सर्व प्रियकरांना आणि ज्यांचा तू तिरस्कार करतेस त्यांना, एकत्र आणीन आणि तुझे नग्न शरीर पाहू देईन.तुझे संपूर्ण नग्न शरीर ते पाहतील.
यहेज्केल 16:36-37 -
हा होशेयला आलेला परमेश्वराचा पहिलाच संदेश होता. परमेश्वर म्हणाला, “जा आणि वेश्येशी लग्न कर. तिला मुले होऊ देत. का? कारण ह्या देशातील लोक वेश्येप्रमाणेच वागले आहेत. त्यांनी परमेश्वराचा विश्वासघात केला आहे.”
होशेय 1:2 -
“तुम्ही आपल्या आईशी वाद घाला. खुशाल वाद घाला.कारण ती माझी पत्नी नाही व मी तिचा पती नाही. वेश्येप्रमाणे वागण्याचे सोडून देण्यास तिला सांगा. तिच्या स्तनापासून तिला तिच्या प्रियकरांना दूर करण्यास सांगा.
होशेय 2:2 -
“‘जर एखादा मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तर त्याने तिला घटस्फोटाची लेखी सूचना द्यावी.’असे सांगितल्याचे तुम्ही जाणता. पण मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय इतर कारणामुळे टाकून देतो, तो तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो आणि जो कोणी अशा घटस्फोटीत स्त्रीशी विवाह करतो तो व्यभिचार करतो.शपथ घेण्याविषयी येशूची शिकवन
मत्तय 5:31-32 -
आणि देव म्हाणाला, म्हणून पुरूष आपल्या आईवडिलांना सोडिल व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील. म्हणून दोन व्यक्ति या दोन नाहीत तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे. म्हणून कोणाही व्यक्तिने त्यांना वेगळे करू नये.”
मत्तय 19:5-6 -
ज्याने ज्याने माझ्या मागे येण्याकरिता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्याला त्यापेक्षा कितीतरी जास्तापटीने लाभ होईल व त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.
मत्तय 19:29 -
ते म्हणाले, गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मेला आणि त्याला मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने किंवा जवळच्या नातेवाईकाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मेलेल्या भावासाठी त्यांना मुले होतील. ...तुम्हांला समजले पाहिजे की, पुनरूत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत. उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील.
मत्तय 22:24, 30 -
ते म्हणाले, “मोशेने पुरूषाला सुटपत्र लिहिण्याची व असे करून आपल्या बायकोला सोडण्याची परवानगी दिली आहे.” येशू म्हणाला, “कारणकेवळ तुमच्या हट्टामुळे मोशेने तुमच्यासाठी ही पर्यायी अनुमति दिली (लिहिली) आहे. परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना पुरूष व स्त्री असे निर्माण कोले. या कारणामुळे पुरुष आपल्या आईवडिलांना सोडील व आपल्या पत्नीशी जडून राहील. आणि ती दोघे एकदेह होतील.म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एकदेह आहेत. यासाठी देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने वेगळे करू नये.”
मार्क 10:4-9 -
आणि जर पत्नी आपल्या नवऱ्याला सोडते आणि दुसऱ्याबरोबर लग्न करते तर तीही व्यभिचार करते.”
मार्क 10:12 -
तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी स्त्री होती. ती फनूएलाची मुलगी होती. ती अशेर वंशाची होती. ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली.
लूक 2:36 -
“जेव्हा एखादा तुम्हांला लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका. कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या माणसाला त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल.
लूक 14:8 -
नोहा तारवात जाईपर्यंत असे चालले होते. मग पूर आला. व त्या सर्वांचा नाश झाला.
लूक 17:27 -
येशूने पुन्हा वर पाहिले आणि तिला विचारले, “बाई, ते सर्व लोक निघून गेले आहेत, त्यातील एकानेही तुला दोषी ठरविले नाही काय?” त्या स्त्रीने उत्तर दिले. “महाराज, मला कोणीही दोषी ठरविले नाही.” मग येशू म्हणाला, “मग मीही तुझा न्याय करीत नाही. आता तू जाऊ शकतेस, पण परत पाप करु नकोस.” (वचने 7:53 ते 8:11 अति जुन्या व उत्तम ग्रीक प्रतीमध्ये ही वचने नाहीत)
योहान 8:10-11 -
कारण लग्न झालेली स्त्री जोपर्यंत तिचा पती जिवंत आहे तोपर्यंत ती नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते, पण जर तिचा नवरा मेला तर ती पतीविषयीच्या नियमातून मोकळी होते. म्हणून पती जिवंत असताना ती दुसन्याची झाली, तर तिला व्यभिचारिणी असे म्हणतील. पण जर तिचा पती मरण पावला तर ती लग्नाच्या नियमातून मुक्त होते आणि जरी ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही.
रोमकरांस 7:2, 3 -
खरोखरच असे सांगण्यात आले आहे की, तुमच्यामध्ये जारकर्म चालू आहे. ते असे की, आपणामध्ये कोणी आपल्या सावत्र आईशी अनैतिक संबंध ठेऊन आहे. वास्तविक असले दुष्कृत्य विदेशी लोकांमध्येही आढळणार नाही. आणि तरीही तुम्ही गर्वांने फुगला आहात, परंतु तुम्हांला त्याबद्दल शोक व्हायला नको होता का? ज्या कोणी हे कर्म केले असेल त्याला तुमच्यातून काढून टाकले पाहिजे.
1 करिंथकरांस 5:1, 2 -
किंवा तुम्हांला माहीत नाही का की, अनीतिमान लोकांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही? तुमची स्वत:ची फसवणूक होऊ देऊ नका! जारकर्मी, मूर्तिपूजक, व्याभिचारी, पुरुषवेश्या (पुरुष जे समलिंगी संबंधास तयार होतात), समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष, किंवा दरोडेखोर, लोभी, दारुडे, निंदा करणारे, फसविणारे यांपैकी कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाही.
1 करिंथकरांस 6:9-10 -
“अन्र पोटासाठी आहे व पोट अन्रासाठी आहे.” आणि हे खरे आहे. पण देव अन्राचा व पोटाचा अशा दोघांचाही नाश करील. आणि आमची शरीरे ही जारकर्मसाठी नाही तर देवाच्या सेवेसाठी आणि प्रभूच्या शरीराच्या हितासाठी आहेत. आणि देवाने केवळ प्रभूलाच मरणातून उठविले असे नाही तर तो आम्हंलाही आपल्या सामर्थ्याने मरणातून उठवील.
1 करिंथकरांस 6:13, 14 -
जारकर्मापासून दूर पळा. मनुष्य एखादे पाप करणे शक्य आहे ते त्याच्या शरीराबाहेरचे आहे. परंतु जो जारकर्म करतो तो त्याच्या स्वत:च्या शरीराविरुद्ध पाप करतो. किंवा तुम्हाला हे माहीत नाही काय तुमची शरीरे ही तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे व जो तुम्हांला देवाकडून प्राप्त झाला त्यांचे मंदिर आहे, आणि स्वत:चे असे तुम्ही नाही? 0कारण तुम्हांला किंमत देऊन विकत घेतले आहे. म्हणून तुमच्या शरीराने देवाला गौरव द्या.
1 करिंथकरांस 6:18-20 -
आता, तुम्ही ज्याविषयी आपणा त्यासंबंधाने: एखाद्या मनुष्याने एखाद्या स्त्रीला स्पर्श न करणे हे त्याच्यासाठी चांगले आहे, परंतु जारकर्माचा मोह टाळण्यासाठी, प्रत्येक पुरुषाला त्याची स्वत:ची पत्नी असावी. व प्रत्येक स्त्रीला तिचा स्वत:चा पती असावा.
1 करिंथकरांस 7:1, 2 -
पतीने त्याच्या पत्नीला पत्नी म्हणून तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीने तिच्या पतीला पतीचा हक्क द्यावा. पत्नीला तिच्या स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो तिच्या पतील आहे. विषयसुखासाठी एकमेकाला वचित करु नका, तुम्हालां प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा. आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुम्च्यात आत्मसंयमन नसल्याने मोहात पाडू नये.
1 करिंथकरांस 7:3-5 -
परंतु जे अविवाहित व विधवा आहेत त्यांना मी म्हणून की, म्हपासारखीचराहिली तर त त्यांना बरे. आता जे विवाहित आहेत त्यांना मी आज्ञा देतो. मी ती आज्ञा देत नसून प्रभु देत आहे. पत्नीने तिच्या पतीपासून वेगळे होण्याचे पाहू नये. पण जर ती वेगळे राहते तर तिने लग्न न करताच राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा. आणि पतीने आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देऊ नये.
1 करिंथकरांस 7:8-11 -
कारण विश्वास न ठेवणाऱ्या पतीचे त्याच्या ख्रिस्ती पत्नीबरोबरच्या निकट सहवासाद्वारे पवित्रीकरण झाले आहे आणि विश्वास न ठेवणाऱ्या पत्नीचे त्या ख्रिस्ती पतीबरोबरच्या निकट सहवासाद्वारे त्यांचे नाते देवाच्या दृष्टीनेही कायदेशीर आहे. नाहीतर तुमची मुले अशुद्ध झाली असती, परंतु आता ती पवित्र आहेत.
1 करिंथकरांस 7:14 -
माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही काळजीपसून मुक्त असावे. अविवाहित पुरुष प्रभूच्या कामाविषयी आणि त्याला कसे संतोषविता येईल याबाबत काळजीत असतो. परंतु विवाहित पुरुष जगिक गोष्टीविषयी आणि आपल्या पत्नीला कसे आनंदीत ठेवता येईल या काळजीत असतो. त्यामुळे तो द्विधा अवस्थेत असतो. आणि एखादी अविवाहित स्त्री किंवा कुमारिका, प्रभूच्या कामाबद्दल उत्सुक असते. यासाठी की, तिने शरीराने आणि आत्म्याने पवित्र असावे. परंतु विवाहित स्त्री जगिक गोष्टी आणि तिच्या पतीला कसे आनंदी ठेवता येईल याचीच चिंता करते.
1 करिंथकरांस 7:32-34 -
पति जिवंत आहे तोपर्यंत स्त्री लग्नाने बांधलेली आहे, पण तिचा पति मेला तर तिला पाहिजे त्याच्याशी परंतु केवळ प्रभूमध्ये लग्न करण्यास ती मोकळी आहे.
1 करिंथकरांस 7:39 -
देहाची कर्मे तर उघड आहेत, ती म्हणजे, जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटूक, द्वेष, मारामारी,मत्सर, राग, स्वार्थी हेवेदावे, पक्षभेद, दारुबाजी, रंगेलपणा, अशासारख्या दुसऱ्या सर्व गोष्टी. या गोष्टीविषयी मीतुम्हांला सूचना देत आहे. ज्याप्रमाणे मी पूर्वी तुम्हांला सूचना केल्या होत्या. जे लोक अशा गोष्टी करतात त्यांना देवाच्याराज्यात वाटा मिळणार नाही.
गलतीकरांस 5:19-21 -
जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नावही निघू नये, हे देवाच्या पवित्र लोकांसाठी योग्य नाही.
इफिसकरांस 5:3 -
पत्नींनो, जशा तुम्ही प्रभुच्या अधीन होता, तशा आपल्या पतींच्या अधीन असा. कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. ख्रिस्त स्वत:च शरीराचा तारणारा आहे. पण, ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीति करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीति करा. त्याने तिच्यासाठी स्वत:ला दिले, यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन निर्मळ करावे. यासाठी की, तो मंडळीला स्वत:साठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल. किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल. याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नींवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वत:च्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वत:च्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वत:वर प्रेम करतो. कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा द्वेष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो. कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. शास्त्र सांगते त्याप्रमाणे, “म्हणून मनुष्य त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील. आणि ते दोघे एकदेह होतील.” हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते. तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वत:च्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे. व पत्नी नेही पतीचा मान राखाला पाहिजे.
इफिसकरांस 5:22-33 -
म्हणून तुमच्यामध्ये पृथ्वीतलावरील जे काही आहे ते सर्व जिवे मारा. जारकर्म, अशुद्धता, लोभ, दुष्ट इच्छा, अधाशीपणा, जी एक प्रकारची मूर्तिपूजा आहे.
कलस्सैकरांस 3:5 -
आणि हेच देवाला पाहिजे आहे. तुम्ही पवित्र असावे ही त्याची इच्छा आहे. तुम्ही जारकर्मपासून दूर असावे ही त्याची इच्छा आहे. त्याची अशी इच्छा आहे की, तुम्हातील प्रत्येकाने स्वत:च्या शरीरावर ताबा मिळविण्यास शिकावे. आणि ज्यांना देव माहीत नाही, ज्यांना देवाची ओळख नाही त्या विदेशी लोकांप्रमाणे कामवासनेने नव्हे.
1 थेस्सलनीकाकरांस 4:3-5 -
खुनी लोकांसाठी, जारकर्मी, समलिंगसंभोगी, इतर मनुष्यांना फसविणारे, खोटारडे, खोटी शपथ घेणारे यांच्यासाठी आहे. इतर जे दुसरे सगळे करतात ते चांगल्या शिक्षणाविरुद्ध आहेत,
1 तीमथ्याला 1:10 -
आता अध्यक्षाने (सर्वागीण काळजीवाहकाने) त्याचे जीवन लोकांनी टीका करु नये अशा रीतीने जगावे. त्याला एकच पत्नी असावी. ..जे खास मदतनीस आहेत त्यांना फक्त एकच पत्नी असावी. आणि त्यांनी त्यांच्या मुलांची व कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी.
1 तीमथ्याला 3:2, 12 -
ज्याच्यावर दुराचरणाचा दोष नसेल, ज्याला एकच पत्नी असेल, ज्याला मुले असून ती विश्वासणारी असतील. ज्याच्यावर स्वैर जीवन जगल्याचा आरोप नसेल, अशा प्रकारच्या व्यक्तीस नेमावे.
तीताला 1:6 -
सर्वांनी लग्नाचा आदर करावा. व वैवाहिक अशुद्धता असू नये. कारण जे व्यभिचारी व विषयवासनेबद्दल भ्रष्ट आहेत अशा लोकांचा देव न्याय करील.
इब्री लोकांस 13:4 -
तसेच पतींनो, तुम्ही आपल्या पत्नींबरोबर समंजसपणाने राहा. त्या जरी अबला असल्या तरी त्या देवाच्या कृपेमध्ये तुमच्याबरोबरच वारस आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्याविषयी आदर बाळग, म्हणजे तुम्ही ज्या प्रार्थना देवाला सादर करता त्यात कसलीही बाधा येणार नाही.
1 पेत्र 3:7 -
तरीसुद्धा तुमच्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: इजबेल नावाची स्त्री जी स्वत:ला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीनेमाझ्या सेवकांना अनैतिक लैंगिक पाप व मूर्तीसमोर ठेवलेले अन्न खावयास मोहविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करु देता.
प्रकटीकरण 2:20 -
या लोकांनी इतरांना मारण्यापासून आपली अंत:करणे बदलली नाहीत खूनचेटके तसेच लैंगिक पापांपासून आणि चोरीपासून परावृत्त झाले नाहीत.
प्रकटीकरण 9:21 -
कारण त्याचे न्यायनिवाडे खरे आणि योग्य आहेत ज्या मोठ्या वेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने सर्व पृथ्वी भ्रष्ट केली,तिला देवाने शिक्षा केली आहे. त्याच्या सेवकाच्या रक्ताचा त्याने सूड घेतला आहे.”
प्रकटीकरण 19:2