शांती
-
“तू स्वत: फार म्हातारा होऊन शांतीने मरण पावशील आणि तुझे पूर्वज जेथे पुरलेले आहेत तेथे तुला मूठमाती देतील.
उत्पत्ति 15:15 -
परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो. परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.
स्तोत्रसंहिता 29:11 -
वाईट कृत्ये करणे सोडून द्या. चांगली कृत्ये करा. शांतीसाठी काम करा. शांती मिळे पर्यंत तिच्या मागे धावा.
स्तोत्रसंहिता 34:14 -
विनम्र लोकांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल. आणि ते शांती व समाधानात जगतील.
स्तोत्रसंहिता 37:11 -
शुध्द आणि सत्यवादी राहा शांती करणाऱ्यांना खूप संतती लाभेल.
स्तोत्रसंहिता 37:37 -
जे लोक तुझ्या शिकवणुकीवर प्रेम करतात त्यांना खरी शांती लाभेल. कुठलीही गोष्ट त्यांचा अधपात घडवणार नाही.
स्तोत्रसंहिता 119:165 -
मी म्हणालो, मला शांती हवी, म्हणून त्यांना युध्द हवे आहे.
स्तोत्रसंहिता 120:7 -
जर एखादा माणूस चांगले आयुष्य जगत असेल, परमेश्वराला खुष करत असेल तर त्या माणसाचे शत्रूदेखील त्याच्याबरोबर शांतता राखतील.
नीतिसूत्रे 16:7 -
प्रेम करण्याचीही वेळ असते आणि द्वेष करण्याचीही वेळ असते. युध्द करण्याची वेळ असते आणि शांतीचीही वेळ असते.
उपदेशक 3:8 -
असामान्य बालकाच्या जन्माच्यावेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल “अदभुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र.”
यशया 9:6 -
परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस.
यशया 26:3 -
तो चांगलुपणा कायमची शांती आणि सुरक्षितता आणील.
यशया 32:17 -
तुझी मुले देवाला अनुसरतील. आणि तो त्यांना शिक्षण देईल. मग तुझ्या मुलांना खरोखरच शांतता मिळेल.
यशया 54:13 -
माझे शब्द आनंदाने बाहेर जातील आणि शांती घेऊन येतील. डोंगर आणि टेकड्या आनंदाने नाचू लागतील. शेतांतील झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील.
यशया 55:12 -
”पाप्यांना कधी शांती मिळत नाही.”
यशया 57:21 -
त्यांना शांतीचा मार्ग माहीत नसतो. त्यांच्या जीवनात अजिबात चांगुलपणा नसतो. त्यांचे मार्ग प्रामाणिक नसतात त्याच्याप्रमाणे जीवन जगणाऱ्या कोणालाही कधीही जीवनात शांतता लाभणार नाही.
यशया 59:8 -
माझे लोक अतिशय वाईटरीतीने दुखवले जात आले आहेत. संदेष्ट्यांनी आणि याजकांनी त्यांच्या जखमा बांधाव्यात. पण ते तर त्या जखमावर, किरकोळ खरचटल्यावर करतात त्याप्रमाणे इलाज करतात. ते म्हणतात, ‘ठीक आहे, ठीक आहे ‘पण हे ठीक नाही.
यिर्मया 6:14 -
तुमच्याविषयीच्या योजना मला माहीत असल्याने मी असे म्हणतो.” हा परमेश्वराचा संदेश आहे “तुमच्यासाठी मी चांगल्या योजना आखल्या आहेत. तुम्हाला दु:खविण्याचा माझा बेत नाही. तुम्हाला आशा आणि उज्वल भविष्य देण्याचे मी योजले आहे.
यिर्मया 29:11 -
“पण मग मी त्या नगरीतील लोकांना बरे करीन. मी त्यांना शांती आणि सुरक्षा ह्यांचा आनंद लुटू देईन.
यिर्मया 33:6 -
“तुम्ही भीतीने कापाल. तुम्ही शांतीचा शोध घ्याल पण ती कोठेच मिळणार नाही.
यहेज्केल 7:25 -
“ह्या सर्व गोष्टी इस्राएलच्या खोट्या संदेष्ट्यांबाबत घडतील. ते यरुशलेमच्या लोकांशी बोलतात. ते शांतीचे भाकीत करतात. पण शांती मिळत नाही.” परमेश्वराने, माझ्या प्रभुने, हे सांगितले.
यहेज्केल 13:16 -
हा राजा फार चलाख व लबाड असेल.तो आपल्या धूर्तपणाच्या आणि खोटेपणाच्या बळावर यश मिळवील तो स्वत:ला खूप महत्वाचा समजेल. तो खूप लोकांचा अनपेक्षितपणे घात करील राजपत्रांच्या राजपुत्राशी (देवाशी) लढण्याचा तो प्रयत्न करील. पण त्या क्रूर राजाच्या सत्तेचा नाश होईल. पण त्याचा नाश करणारा हात मानवाचा नसेल.
दानीएल 8:25 -
“जेव्हा श्रीमंत देशांना सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो क्रूर राजा त्यांच्यावर चढाई करील.वाडवडिलांवर तो अगदी योग्य वेळी हल्ला करील. त्याच्या वाडवडिलांना यश मिळाले नाही,पण त्याला मिळेल.परभूत झालेल्या देशांतील वस्तू लूटून तो आपल्या अनुयायांना देईल.भक्कम शहरांचा पराभव व नाश करण्याचे बेत तो आखेल.त्याला यश मिळेल,पण काही काळापुरतेच.
दानीएल 11:24 -
यहूदा पाहा! पर्वतांवरून कोण येत आहे, ते पाहा! शुभवार्तीघेऊन दूत येत आहे तो म्हणतो की तेथे शांतता आहे यहूदा तुझे खास सण साजरे कर तू ज्या गोष्टी करण्याचे वचन दिले आहेस त्या गोष्टी कर दुष्ट तुझ्यावर पुन्हा हल्ला करुन तुझा पराभव करणार नाहीत त्या सर्व दुष्टांचा नाश झाला आहे.
नहूम 1:15 -
परमेश्वर म्हणाला, “मी लेवीबरोबर करार केला. मी त्याला जीवन व शांती देण्याचे वचन दिले. आणि मी ते त्याला दिले. लेवीने मला मान दिला. त्याने माझ्या नावाचा आदर केला.
मलाखी 2:5 -
जे शांति करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल.
मत्तय 5:9 -
जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांति तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांति तुमच्याकडे परत येईल.
मत्तय 10:13 -
असे समजू नका की मी पृथ्वीवर शांती करायला आलो आहे. मी शांति स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे.
मत्तय 10:34 -
मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली.
मार्क 4:39 -
येशू त्या स्त्रीला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतिने जा आणि त्रासापासून मुक्त राहा.
मार्क 5:34 -
“मीठ चांगले आहे. जर मिठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने राहा.ʈ
मार्क 9:50 -
आणि शांतीच्या मार्गावर आमच्या पावलांना मार्गदर्शन करील.”
लूक 1:79 -
“स्वर्गात देवाला गौरव आणि ज्यांच्याबद्दल देव समाधानी आहे, त्या पृथ्वीवरील मनुष्यांत शांति”
लूक 2:14 -
पण तो स्त्रीला म्हणाला, “तुझ्या विश्वासाने तुला वाचविले आहे, शांतिने जा.”
लूक 7:50 -
कोणत्याही घरात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा पहिल्यांदा असे म्हणा, “या घरास शांति असो!’
लूक 10:5 -
जर तो त्याला तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रु दूर अंतरावर असतानाच तो शिष्टमंडळ पाठवून शांततेसाठी तहअटींची विचारणा करील.
लूक 14:32 -
ते म्हणाले, “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!स्तोत्र.
लूक 19:38 -
ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांस म्हणाला, “तुम्हांस शांति असो.”
लूक 24:36 -
“शांति मी तुमच्याजवळे ठेवतो, माझी शांति मी तुम्हांला देतो. जसे जग देते तशी शांति मी तुम्हांला देत नाही. तुमची अंत:करणे अस्वस्थ होऊ देऊ नका. आणि भिऊ नका.
योहान 14:27 -
‘मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. यासाठी की माझ्यामध्ये तुम्हांला शांति मिळावी, या जगात तुम्हांला त्रास होईल, पण धीर धरा! मी जगावर मात केली आहे.”
योहान 16:33 -
ज्या लोकांवर देवाने प्रेम केले आहे व त्याचे पवित्र जन होण्यासाठी बोलाविलेले असे जे लोक रोममध्ये आहेत त्या सर्वांना मी लिहित आहे. आपला पिता व प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून तुम्हांस कृपा व शांति असो.
रोमकरांस 1:7 -
जेथे कोठे ते जातात तेथे विध्वंस व विपत्ती आणतात. त्यांना शांतीचा मार्ग माहीत नाही.” “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.”
रोमकरांस 3:16-18 -
ज्याअर्थी विश्वासाने आपल्याला नीतिमात ठरविले आहे त्याअर्थी आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून शांति मिळाली आहे.
रोमकरांस 5:1 -
देहाचे चिंतन हे मरण आहे. पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांति आहे.
रोमकरांस 8:6 -
त्यांना पाठविले नाही तर उपदेश करणे त्यांना कसे शक्य होईल? असे लिहिले आहे की, “शुभवार्ता आणणाऱ्याचे पाय किती सुंदर आहेत!
रोमकरांस 10:15 -
शक्य असेल तर ते तुमच्यावर अवलंबून असल्याने सर्व लोकांबरोबर शांतीने राहा.
रोमकरांस 12:18 -
खाणे पिणे यात देवाचे राज्या नाही. परंतु नीतिमत्व, शांति आणि आनंद, जो पवित्र आत्म्यात आहे त्यामध्ये आहे.
रोमकरांस 14:17 -
तर मग आपण शांतीला आणि एकमेकांच्या वाढीला मदत करणाऱ्या गोष्टींच्या मागे लागावे.
रोमकरांस 14:19 -
देव जो सर्व आशेचा उगम, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला तो आनंदाने व शांतीने भरो, यासाठी की, तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आशेत विपुल व्हावे.
रोमकरांस 15:13 -
शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
रोमकरांस 15:33 -
देव पिता आणि त्यांचा व आपला प्रभु (येशू ख्रिस्त) यांजपासून कृपा व शांति असो.
1 करिंथकरांस 1:3 -
तरीही विश्वास न ठेवणारा वेगळा होत असेल तर त्याने वेगळे व्हावे. याबाबतीत ख्रिस्ती बंधु किंवा बहीण यांना मोकळीक आहे. देवाने आपल्याला शांतीने राहण्यासाठी बोलावले आहे.
1 करिंथकरांस 7:15 -
कारण देव हा बेशिस्तपणा आणणारा नसून, शांति आणणारा देव आहे. जशा सर्व मंडळ्या देवाच्या पवित्र लोकांच्या बनलेल्या असतात,
1 करिंथकरांस 14:33 -
का? कारण मी तुम्हांवर प्रेम करीत नाही काय? देव जाणतो की, मी तुमच्यावर प्रेम करतो!
2 करिंथकरांस 13:11 -
यांची कृपा चांगुलपण व शांति तुम्हाबरोबर असो.
गलतीकरांस 1:3 -
तर जितके हा नियम पाळतील तितक्यांवर आणि देवाच्या सर्व इस्राएलावर शांति व दयाअसो.
गलतीकरांस 6:16 -
पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो: प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, दयाळूपणा,चांगुलपणा, विश्वास,
गलतीकरांस 5:22 -
कारण त्याच्याद्वारे आम्हांला शांतीचा लाभ झाला आहे. त्याने दोन्ही गोष्टी एक केल्या आणि आपल्या शरीराने त्याने वैराचा, दुभागणाऱ्या भिंतीचा अडथळा पाडून टाकला. त्याने नियमशास्त्र त्याच्या नीतिनियमांसहित रद्द केले. यासाठी की स्वत:मध्ये दोघांचा एक मानव निर्माण करुन शांति करणे त्याला शक्य व्हावे.
इफिसकरांस 2:14, 15 -
शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करा.
इफिसकरांस 4:3 -
आणि सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वहाणा पायी घाला.
इफिसकरांस 6:15 -
जे काही तुम्ही शिकला आहात, जे तुम्हांला मिळाले आहे व जे माझ्याकडून ऐकले आहे आणि जे मी करताना तुम्ही पाहिले आहे, त्या गोष्टी करीत राहा. आणि देव जो शांतीचा उगम आहे तो तुमच्याबरोबर राहील.
फिलिप्पैकरांस 4:9 -
आणि ख्रिस्ताद्वारे सर्व गोर्ष्टींचा स्वत:शी म्हणजे त्या पृथ्वीवरील गोष्टी असोत, किंवा स्वार्गांतील गोष्टी असोत समेट करण्याचे ठरविले. ख्रिस्ताने जे रक्त वधस्तंभावर सांडले त्याद्वारे देवाने शांति केली.
कलस्सैकरांस 1:20 -
आणि ख्रिस्ताची शांति जिच्यासाठी तुम्ही जे एका देहातील लोक त्या तुम्हांला बोलाविले होते ती तुमच्या अंत:करणावर राज्य करो आणि नेहमी उपकार मानणारे व्हा.
कलस्सैकरांस 3:15 -
परंतु बंधूनो, त्या दिवसाने चोराप्रमाणे अचानक येऊन आपल्याला गाठून आश्चर्यात टाकावे अशा प्रकारे आपण अंधारात नाही.
1 थेस्सलनीकाकरांस 5:4 -
पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ जे प्रभूला शुद्ध अंत:करणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीति आणि शांति यांच्या मागे लाग.
2 तीमथ्याला 2:22 -
सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करा व पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण त्याशिवाय (पवित्रतेेशिवाय) कोणालाही प्रभूला पाहता येणार नाही.
इब्री लोकांस 12:14 -
ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभु येशू ख्रिस्त याला रक्ताच्या युगानुयुगाच्या नव्या कराराद्धारे उठविले.
इब्री लोकांस 13:20 -
जे लोक शांततेच्या मार्गाने शांति स्थापन करण्याचा प्रयत्न करतात त्यांना सरळ, नीतिपूर्ण वागण्यामुळे मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींचा लाभ होतो.
याकोब 3:18 -
दुष्टतेपासून त्याने दूर व्हावे व चांगले ते करावे. त्याने शांतीचा शोध करुन ती मिळविली पाहिजे
1 पेत्र 3:11 -
मी पाहिलेतेव्हा लाल रंग असलेला दुसरा घोडा निघाला. घोडेस्वारला पृथ्वीवरुन शांति काढून घेण्याचा अधिकार दिला होता. म्हणजेलोकांनी आपापसांत एकमेकाला ठार करावे. त्याला मोठी तरवार देण्यात आली होती.
प्रकटीकरण 6:4