सुट्ट्या


  • मी पडून विश्रांती घेतो तरी मी जागा होईन हे मला माहीत आहे. मला हे कसे कळते? कारण परमेश्वर मला सांभाळतो माझे रक्षण करतो.
    स्तोत्रसंहिता 3:5
  • मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो का? कारण परमेश्वरा, तू मला सुरक्षित ठेवून झोपवतोस.
    स्तोत्रसंहिता 4:8
  • रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही.
    स्तोत्रसंहिता 91:5
  • भाकरी मिळव्यासाठी लवकर उठणे आणि रात्री उशीरापर्यंत जागणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. देव ज्या लोकांवर प्रेम करतो त्यांची तो ते झोपेत असताना देखील काळजी घेतो.
    स्तोत्रसंहिता 127:2
  • तू जेव्हा झोपशील तेव्हा घाबरणार नाहीस. तू विश्रांती घेशील तेव्हा तुझी झोप शांत असेल.
    नीतिसूत्रे 3:24
  • जो माणूस दिवसभर कष्ट करतो तो घरी येऊन शांतपणे झोपतो. त्याला खायला कमी असले किंवा नसले तरी ते महत्वाचे नसते. पण श्रीमंत माणूस त्याच्या संपत्तीची चिंता करतो आणि त्यामुळे त्याला झोप येत नाही.
    उपदेशक 5:12
  • पण शांती येईल, लोक स्वत:च्या खाटल्यावर विश्रांती घेतील. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे ते जीवन जगतील.
    यशया 57:2
  • “परमेश्वराचे स्तवन करा. इस्राएल लोकांना विसावा देण्याचे त्याने कबूल केले होते. त्याप्रमाणे त्यांने केले आहे. आपला सेवक मोशे याच्यामार्फत त्याने आपल्या फायद्याची अनेक वचने दिली होती. ती परमेश्वराने सर्वच्यासर्व खरी करुन दाखवली आहेत.
    1 राजे 8:56
  • नंतर तुला सुरक्षित वाटेल. कारण तेव्हा तिथे आशा असेल. देव तुझी चिंता वाहील आणि तुला विश्रांती देईल.
    ईयोब 11:18
  • पण शांती येईल, लोक स्वत:च्या खाटल्यावर विश्रांती घेतील. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे ते जीवन जगतील.
    यशया 57:2
  • तुम्ही देवाच्या शब्बाथच्या नियमाविरूध्द वागून पाप करण्याचे थांबवाल आणि विशेष दिवशी स्वत:च्या खुषीकरिता काही करण्याचे टाळाल तेव्हा हे घडून येईल. तुम्ही शब्बाथला आनंदाचा दिवस मानावे. परमेश्वराच्या विशेष दिवसाचा तुम्ही मान राखावा. रोज तुम्ही जे करता आणि जे बोलता ते करण्याचे वा बोलण्याचे टाळून तुम्ही त्या दिवसाचा मान राखावा. मग तुम्ही परमेश्वराजवळ त्याच्या कृपेची मागणी करू शकता. परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवर उच्च जागी नेईल आणि तुमचे वडील याकोब यांच्या मालकीच्या सर्व गोष्टी तो तुम्हाला देईल. परमेश्वरानेच हे सर्व सांगितले असल्यामुळे हे सर्व घडून येईल.
    यशया 58:13-14
  • म्हणून खाताना, पिताना किंवा काहीही करताना सर्व काही देवाच्या गौरवासाठी करा.
    1 करिंथकरांस 10:31
  • म्हणून देवाच्या लोकांसाठी अजूनही सातवा म्हणजे विसाव्याच्या दिवस आहे. कारण जो कोणी देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करतो, तो त्याच्या स्वत:च्या कामापासून विसावा घेतो. ज्याप्रमाणे देवाने त्याच्या कामापासून विसावा घेतला होता.
    इब्री लोकांस 4:9, 10