स्तुती निकाल


  • लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने चाल करुन आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेइर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली.
    2 इतिहास 20:22
  • नहेम्या म्हणाला, “आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेये प्या. ज्यांना असे खाणेपिणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्य-पेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दु:खी राहू नका. कारण परमेश्वराचा आनंदच तुम्हाला सामर्थ्य देणार आहे.”
    नहेम्या 8:10
  • म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखरच मला मान देतो. जर एखद्या माणसाने त्याचे आयुष्य बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”
    स्तोत्रसंहिता 50:23
  • देवा, तुझे इमानी भक्त खरोखरच सुखी आहेत. ते तुझ्या दयेच्या प्रकाशात जगतात.
    स्तोत्रसंहिता 89:15
  • “तेथील लोक स्तुतिस्तोत्रे गातील. तेथे हास्याच्या लहरी उठतील. त्यांना मी पुष्कळ संतती देईन इस्राएल व यहूदा यांचा आकार लहान राहणार नाही मी त्यांना मान मिळवून देईन. कोणीही त्यांना खाली पाहणार नाही.
    यिर्मया 30:19
  • विश्वासणारे देवाची स्तुति करीत. आणि सर्व लोकांना ते आवडत असत. आणि अधिकाधिक लोक तारले जात होते. व विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये प्रभु रोज अनेक लोकांची भर घालीत असे.
    प्रेषितांचीं कृत्यें 2:47
  • कशाचीही काळजी करु नका, तर प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना आणि विनंत्या उपकार मानून तुमच्या विनंत्या देवाला कळवा.
    फिलिप्पैकरांस 4:6
  • नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. “जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद करा आणि उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण जे संदेष्टे तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.
    मत्तय 5:10-12
  • “जेव्हा लोक तुमचा द्धेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील आणि तुमचा अपमान करतील, जेव्हा तुमचे नाव ते वाईट समजतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हाला नाकारतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल. त्या दिवशी तुम्ही आनंद करा. आनंदाने उड्या मारा कारण स्वर्गात तुमचे बक्षीस मोठे आहे! कारण त्यांच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना सुध्दा तसेच केले.
    लूक 6:22, 23
  • ‘मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. यासाठी की माझ्यामध्ये तुम्हांला शांति मिळावी, या जगात तुम्हांला त्रास होईल, पण धीर धरा! मी जगावर मात केली आहे.”
    योहान 16:33
  • प्रेषित सभा सोडून गेले. येशूच्या नावासाठी आपण निंदानालस्ती सहन करण्याच्या योग्यतेचे ठरलो यामुळे ते आंनदी झाले.
    प्रेषितांचीं कृत्यें 5:41
  • होय, हे मानवा, देवाला उलट उत्तर देणारा तू कोण आहेस? जे घडले आहे ते घडणाऱ्याला, “तू मला असे का केलेस” असे विचारील काय?
    रोमकरांस 9:20
  • दु:खी तरी नेहमी आनंद करीत, गरीब तरी पुष्कळांना श्रीमंत करणारे, जवळ काही नसलेले तरी सर्व काही जवळ असणारे असे आहोत.
    2 करिंथकरांस 6:10
  • मी हे गरजेपोटी बोलतो असे नाही कारण आहे त्या स्थितीत मी समाधानी राहण्याचे शिकलो आहे.
    फिलिप्पैकरांस 4:11
  • प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना.
    1 थेस्सलनीकाकरांस 5:18
  • एवढेच नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही झीजदेखील सोसली. जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही मदत केली. त्यांच्या दु:खात सहभागी झाला आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता. कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.
    इब्री लोकांस 10:34
  • जरी तुम्ही येशूला पाहिले नाही, तरी तुम्ही त्याच्यावर प्रीति करता. जरी आता तुम्ही त्याच्याकडे पाहू शकत नसला तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही व्यक्त करता येणार नाही, अशा गौरवी आनंदाने भरला आहात.
    1 पेत्र 1:8
  • जे योग्य ते करुनसुद्धा जर तुम्हांला दु:ख सहन करावे लागते, तर तुम्ही धन्य आहात. म्हणून “त्या लोकांची भीति बाळगू नका किंवा गर्भगळित होऊ नका”
    1 पेत्र 3:14
  • त्याऐवजी, तुम्ही ख्रिस्ताच्या दु:खसहनाचे भागीदार झाल्याबद्दल आनंद करा. यासाठी की, जेव्हा त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हा तुम्ही आनंदाने आरोळी मारावी. पण जर तुम्ही ख्रिस्ती म्हणून दु:ख सहन केले तर तुम्हांला त्याबद्दल लाज वाटण्याचे मुळीच कारण नाही. तर तुम्हांला “ख्रिस्ती” हे नाव मिळाल्याने देवाला गौरव द्यावे.
    1 पेत्र 4:13, 16
  • चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा. शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!
    स्तोत्रसंहिता 32:11
  • चांगले लोकहो! परमेश्वरापाशी आंनद व्यक्त करा. न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
    स्तोत्रसंहिता 33:1
  • मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन. माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल.
    स्तोत्रसंहिता 34:1
  • म्हणून परमेश्वरा तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन. मी रोज तुझी स्तुती करेन.
    स्तोत्रसंहिता 35:28
  • परमेश्वराची स्तुती करा. तो रोज आपल्याला आपले ओझे वाहायला मदत करतो देव आपल्याला तारतो.
    स्तोत्रसंहिता 68:19
  • तू केलेल्या अद्भुत गोष्टींचे मी नेहमी गुणगान करीत असतो.
    स्तोत्रसंहिता 71:8
  • परमेश्वराची स्तुती करणे चांगले असते. परात्पर देवा, तुझ्या नावाचे उपकारस्मरण करणे चांगले असते. तुझ्या प्रेमा बद्दल सकाळी गाणे आणि रात्री तुझ्या इमानीपणाबद्दल जयजयकार करणे चांगले असते.
    स्तोत्रसंहिता 92:1, 2
  • त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या. त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या. त्याला मान द्या. त्याच्या नावाचा जयजयकार करा.
    स्तोत्रसंहिता 100:4
  • माझ्या आत्म्या परमेश्वराचा जयजयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करु दे. 2 माझ्या आत्म्या, परमेश्वराचा जयजयकार कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरु नकोस.
    स्तोत्रसंहिता 103:1, 2
  • माझ्या आत्म्या परमेश्वराचा जयजयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करु दे. 2 माझ्या आत्म्या, परमेश्वराचा जयजयकार कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरु नकोस.
    स्तोत्रसंहिता 107:8
  • परमेश्वराने जे काही केले त्याबद्दल त्याला धन्यवाद म्हणून बळी अर्पण करा. परमेश्वराने केलेल्या गोष्टी आनंदाने सांगा.
    स्तोत्रसंहिता 107:22
  • पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे असे मला वाटते.
    स्तोत्रसंहिता 113:3
  • स्वर्गातील परमेश्वराकडे आपण आपले हृदय व हात उंचावू या.
    विलापगीत 3:41
  • फक्त परमेश्वरा मुळेच तारण मिळते “हे परमेश्वरा, मी तुला यज्ञ अर्पण करीन मी तुझे स्तवन करीन आणि कृतज्ञता व्यक्त करीन मी तुला नवस बोलेन आणि तो फेडेन.”
    योना 2:9
  • स्तोत्रे, गीते, आणि आध्यात्मिक गीतांनी एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गाणी गा, आणि आपल्या अंत:करणात प्रभूसाठी गायन गा. आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.
    इफिसकरांस 5:19, 20
  • प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना.
    1 थेस्सलनीकाकरांस 5:18
  • प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना.
    इब्री लोकांस 13:15
  • मग सिंहासनावरुन एक वाणी झाली, ती म्हणाली,“देवाच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुति करा, जे तुम्ही त्याचे भय धरता ते तुम्ही सर्व लहानथोर देवाची स्तुति करा!”
    प्रकटीकरण 19:5