1 योहान

1 2 3 4 5


धडा 5

प्रत्येकजण जो विश्वास ठेवतो की येशू हा ख्रिस्त आहे तो देवाचे मूल झालेला आहे. आणि प्रत्येकजण जो पित्यावर प्रीतिकरतो तो त्याच्या मुलावरही प्रीति करतो.
2 अशा प्रकारे आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या पुत्रावर प्रीति करतो: देवावरप्रीति करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने.
3 देवाप्रती असलेली आमची प्रीति आम्ही त्याच्या आज्ञापालनाकडून दाखवूशकतो आणि त्याच्या आज्ञा फार अवजड नाहीत.
4 कारण प्रत्येकजण जो देवाचा मूल होतो तो जगावर विजय मिळवितो,आणि यामुळे आम्हांला जगावर विजय मिळाला: आमच्या विश्वासाने.
5 येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वासधरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळविणारा कोण आहे?
6 येशू ख्रिस्त आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला. तो केवळ पाण्याद्वारेच आमच्याकडे आला असे नाही तर पाणी आणिरक्ताद्वारे आला, व आत्मा ही साक्ष देतो, कारण आत्मा सत्य आहे.
7 साक्ष देणारे तीन साक्षीदार आहेत:
8 आत्मा, पाणीआणि रक्त, आणि दिघेही एकच साक्ष देतात.
9 जर आम्ही मनुष्यांनी दिलेली साक्ष स्वीकारतो, तर देवाने दिलेली साक्षत्यांच्या साक्षीहून अधिक महान आहे हे आपण ओळखले पाहिजे. देवाने आपणास दिलेली साक्ष ही त्याच्या एकुलत्या एकापुत्राविषयीची आहे.
10 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वत:मध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवरविश्वास ठेवीत नाही, त्याने देवाला लबाड ठरविले आहे. कारण देवाने आपल्या स्वत:च्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्यानेविश्वास ठेवला नाही.
11 आणि देवाची जी साक्ष आहे ती ही आहे की, देवाने आपल्याला अनंतकाळचे जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्यापुत्रामध्ये आहे.
12 ज्याच्याजवळ पुत्र आहे त्याला खरे जीवन आहे पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्याला खरे जीवन नाही.
13 जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हाला अनंतकाळचे जीवनआहे, याविषयी तुम्ही निश्र्चिंत असावे,
14 आणि आम्हांला देवामध्ये खात्री आहे की, जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीसाठीत्याच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करतो, तेव्हा तो आमचे ऐकतो.
15 आणि आम्हांला हे माहीत आहे की जर तो आमचे ऐकतो,तर कोणत्याही कारणासाठी जरी आम्ही प्रार्थना केली, तर आम्हांस माहीत आहे की, जे काही आम्ही मागितले आहे तेआम्हांला मिळालेच आहे.
16 जर एखाद्याला त्याचा भाऊ पापांत पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम अनंतकाळचे मरण नसेल तर त्या भावासाठीत्याने प्रार्थना करावी. आणि देव त्याला जीवन देईल. ज्या गोष्टीचा परिणाम अनंतकाळचे मरण नाही अशा पापामध्येपडणाऱ्यासाठी जे जीवन (देव देतो) त्या जीवनाविषयी मी हे बोलत आहे. ज्या पापाचा परिणाम मरण आहे. अशा तऱ्हेच्यापापाबाबत तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही.
17 सर्व अनीति हे पाप आहे, पण असे पाप आहे ज्याचा परिणाममरण नाही.
18 आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत रहात नाही. जो देवापासून जन्मला आहे. देवस्वत: त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्याला हात लावू शकत नाही.
19 आम्हाला माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत,जरी संपूर्ण जग हे त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे.
20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की, जो खराआहे त्या देवाला आम्ही ओळखावे. आणि आपणास माहीत आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आला आहे व जो खरा देवआणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याजमध्ये आम्ही राहात आहोत. पिता हा खरा देव आहे आणि तो अनंतकाळचे जीवन आहे.
21 माझ्या मुलांनो, स्वत:ला मूर्तिपूजेपासून दूर राखा.