1 करिंथकरांस

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16


धडा 7

आता, तुम्ही ज्याविषयी आपणा त्यासंबंधाने: एखाद्या मनुष्याने एखाद्या स्त्रीला स्पर्श न करणे हे त्याच्यासाठी चांगले आहे,
2 परंतु जारकर्माचा मोह टाळण्यासाठी, प्रत्येक पुरुषाला त्याची स्वत:ची पत्नी असावी. व प्रत्येक स्त्रीला तिचा स्वत:चा पती असावा.
3 पतीने त्याच्या पत्नीला पत्नी म्हणून तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीने तिच्या पतीला पतीचा हक्क द्यावा.
4 पत्नीला तिच्या स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो तिच्या पतील आहे.
5 विषयसुखासाठी एकमेकाला वचित करु नका, तुम्हालां प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा. आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुम्च्यात आत्मसंयमन नसल्याने मोहात पाडू नये.
6 परंतु मी हे तुम्हांला सवलत म्हणून सांगतो, आज्ञा म्हणून नव्हे.
7 मला असे वाटते की, सर्व लोक माझ्यासारखे असावेत पण प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वत:चे असे देवापासून दान आहे. एकाला एका प्रकारे राहण्याचे आणि दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारे राहण्याचे.
8 परंतु जे अविवाहित व विधवा आहेत त्यांना मी म्हणून की, म्हपासारखीचराहिली तर त त्यांना बरे.
9 आता जे विवाहित आहेत त्यांना मी आज्ञा देतो. मी ती आज्ञा देत नसून प्रभु देत आहे. पत्नीने तिच्या पतीपासून वेगळे होण्याचे पाहू नये.
10
11 पण जर ती वेगळे राहते तर तिने लग्न न करताच राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा. आणि पतीने आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देऊ नये.
12 आता इतरासाठी सांगतो, आणि हे मी सांगत आहे, प्रभु नाही: जर एखाद्या ख्रिस्ती बांधवाची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल, आणि त्याच्याबरोबर राहण्यास ती राजी असेल तर त्याने तिला सोडचिठ्ठी देऊ नये.
13 आणि एखाद्या स्त्रीचा नवरा जर विश्वास ठेवणारा नसेल आणि तो तिच्याबरोबर राहण्यास राजी असेल तर तिने त्याला सोडचिठ्ठी देऊ नये,
14 कारण विश्वास न ठेवणाऱ्या पतीचे त्याच्या ख्रिस्ती पत्नीबरोबरच्या निकट सहवासाद्वारे पवित्रीकरण झाले आहे आणि विश्वास न ठेवणाऱ्या पत्नीचे त्या ख्रिस्ती पतीबरोबरच्या निकट सहवासाद्वारे त्यांचे नाते देवाच्या दृष्टीनेही कायदेशीर आहे. नाहीतर तुमची मुले अशुद्ध झाली असती, परंतु आता ती पवित्र आहेत.
15 तरीही विश्वास न ठेवणारा वेगळा होत असेल तर त्याने वेगळे व्हावे. याबाबतीत ख्रिस्ती बंधु किंवा बहीण यांना मोकळीक आहे. देवाने आपल्याला शांतीने राहण्यासाठी बोलावले आहे.
16 कारण पत्नी, तू तुइया विश्वास न ठेवणाऱ्या पतीला तारु शकशील हे तुला कसे माहीत? किंवा पती, तू आपल्या विश्वास न ठेवणाऱ्या पत्नीला तारशील हे तुला कसे माहीत?देवाने पाचारण केल्याप्रमाणे राहा.
17 फक्त, देवाने प्रत्येकाला जसे नेमले आहे आणि देवाने जसे प्रत्येकाला पाचारण केले आहे त्याप्रमाणे त्याने राहावे. आणि अशी मी सर्व मंडळ्यांना आज्ञा करतो.
18 एखाद्याला जेव्हा देवाने पाचारण केले होते तेव्हा त्याची अगोदरच सुंता झाली होती काय? त्याने आपली सुंता लपवू नये. कोणाला सुंता न झालेल्या स्थितीत पाचारण झाले काय, तर त्याने सुंता करु नये.
19 सुंता म्हणजे काही नाही व सुंता न होणे म्हणजेही काही नाही. तर देवाची आज्ञा पाळणे यात सर्व काही आहे.
20 प्रत्येकाने ज्या स्थितीत त्याला पाचारण झाले त्या स्थितीत राहावे.
21 तुला गुलाम म्हणून पाचारण झाले होते काय? त्यामुळे तुला त्रास होऊ नये, परंतु तुला स्वतंत्र होणे शक्य असेल तर पुढे हो व संधीचा उपयोग करुन घे.
22 कारण जो कोणी प्रभुमध्ये गुलाम असा पाचारण केलेला होता तो देवाचा मुक्त केलेला मनुष्य आहे, त्याचप्रमाणे ज्या मुक्त मनुष्याला देवाचे पाचारण झाले आहे तो देवाचा गुलाम आहे.
23 तुम्हांला किंमत देऊन विकत घेतले होते. मनुष्यांचे गुलाम होऊ नका.
24 बंधूनो, तुम्हांतील प्रत्येकाने ज्या स्थितीत त्याला पाचारण झाले होते, त्याच स्थितीत त्याने देवासमोर राहावे.
25 आता कुमारिकेविषयी, मला प्रभूपासून आज्ञा नाही, पण मी माझे मत देतो. जो मी विश्वासनीय आहे कारण प्रभूने आम्हावर दया दाखविली.
26 मी हे असे समजतो: सध्याच्या दुर्दशेत हे चांगले आहे, (होय) हे चांगले आहे की, एखाद्याने माइयासारखे एकटे राहावे.
27 तुम्ही पत्नीशी बांधलेले आहात काय? तर मोकळे होण्यास पाहू नका. स्त्रीपासून मोकळे आहात काय? लग्न करण्याचे पाहू नका.
28 पण जरी तुम्ही लग्न केले तरी तुम्ही पाप केलेले नाही. आणि जर कुमारिका लग्न करते तर तिने पाप केले नाही. पण अशा लोकांना शारीरिक पीडा होतील आणि या पीडा टाळण्यासाठी मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
29 हेच मी म्हणत आहे, बंधूनो, वेळ थोडा आहे. येथून पुढे ज्यांना पत्न्या आहेत त्यांनी त्या नसल्यासारखे राहावे.
30 जे शोक करीत आहेत त्यांनी शोक करीत नसल्यासारखे, जे आनंदी आहेत त्यांनी आनंदी नसल्यासारखे, जे वस्तु विकत घेत आहेत, त्यांनी जणू काही त्यांच्याकडे स्वत:चे काहीच नाही
31 आणि जे लोक जग त्यांना ज्या त्यांना ज्या गोष्टी देऊ करते व त्या गोष्टींचा जे उपयोग करुन घेतात, त्यांनी जणू काय त्या गोष्टींचा पूर्ण उपयोग करुन घेतला नाही, असे राहावे. कारण या जगाची सध्याची स्थिती लयास जात आहे.
32 माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही काळजीपसून मुक्त असावे. अविवाहित पुरुष प्रभूच्या कामाविषयी आणि त्याला कसे संतोषविता येईल याबाबत काळजीत असतो.
33 परंतु विवाहित पुरुष जगिक गोष्टीविषयी आणि आपल्या पत्नीला कसे आनंदीत ठेवता येईल या काळजीत असतो.
34 त्यामुळे तो द्विधा अवस्थेत असतो. आणि एखादी अविवाहित स्त्री किंवा कुमारिका, प्रभूच्या कामाबद्दल उत्सुक असते. यासाठी की, तिने शरीराने आणि आत्म्याने पवित्र असावे. परंतु विवाहित स्त्री जगिक गोष्टी आणि तिच्या पतीला कसे आनंदी ठेवता येईल याचीच चिंता करते.
35 मी हे तुमच्याच फायद्यासाठी सांगत आहे. तुमच्यावर बंधने लादण्यासाठी सांगत नाही. आचरणातील, सुव्यवस्थेतील फायद्यासाठी व प्रभूच्या सेवेसाठी विनाअडथळा तुम्हाला समर्पण करणे शक्य व्हावे म्हणून सांगतो.
36 जर एखाद्याला असे वाटते की, तो त्याच्या कुमारिकेविषयी योग्य ते करीत नाही आणि जर त्याच्या भावना तीव्र आहेत, तर त्या दोघांनी पुढे होऊन लग्न करुन घेणे आवश्यक आहे. त्याला जे वाटते ते त्याने करावे.
37 तो पाप करीत नाही. त्याने लग्न करुन घ्यावे. परंतु जो स्वत: मनाचा खंबीर आहे व जो कोणत्याही दडपणाखाली नाही पण ज्याचा स्वत:च्या इच्छेवर ताबा आहे. व ज्याने आपल्या मनात विचार केला आहे की आपल्या कुमारिकेला ती जशी आहे तशीच ठेवावी म्हणजे तिच्याशी विवाह करु नये, तर तो चांगले करतो.
38 म्हणून जो कुमारिकेशी लग्न करतो तो चांगले करतो पण जो तिच्याशी लग्न करीत नाही तो अधिक चांगले करील.
39 पति जिवंत आहे तोपर्यंत स्त्री लग्नाने बांधलेली आहे, पण तिचा पति मेला तर तिला पाहिजे त्याच्याशी परंतु केवळ प्रभूमध्ये लग्न करण्यास ती मोकळी आहे.
40 परंतु माझ्या मते ती आहे तशीच राहिली तर ती अधिक सुखी होईल आणि मला असे वाटते की, मलाही प्रभूचा आत्मा आहे.