सफन्या
धडा 2
निर्लज्ज लोकांनो,
2 मलूल होऊन सुकून जाणाऱ्या फुलाप्रमाणे तुमचे जीवन होण्याआधीचे तुमचे आचार बदला. दिवसाच्या उष्णतेने, फूल कोमेजून वाळून जाते. परमेश्वराने आपला क्रोध प्रकट करताच, तुमचीही स्थिती तशीच होईल. म्हणून परमेश्वराचा क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्यापूर्वीच तुमचे आचरण बदला.
3 सर्व दीन लोकांनो, परमेश्वराला शरण या! त्याचे विधिनियम पाळा. सत्कृत्य करायला शिका. नम्र होण्यास शिका. मग कदचित् परमेश्वर जेव्हा क्रोध प्रकट करील, तेव्हा तुम्ही सुरक्षित राहाल.
4 गज्जात कोणीही शिल्लक शहणार नाही. अष्कलोनचा नाश होईल दुपारी, अश्दोदमधील लोकांना, बळजबरीने बाहेर काढले जाईल, एक्रोन ओसाड होईल.
5 पलिष्ट्यांनो, समुद्राकाठी राहणाऱ्या लोकांनो, परमेश्वराचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. कनान मधील या फिलिस्ताईनच्या भूमीचा नाश होईल ते देश निर्जन होतील.
6 तुमची समुद्राकाठची जमीन मेंढ्यांसाठी व मेंढपाळासाठी मोकळी राने होतील.
7 त्यानंतर ती भूमी यहूदातील जिवंत राहिलेल्या लोकांच्या मालकीची होईल. यहूदातील ह्या लोकांची परमेश्वर आठवण ठेवील. आता ते परदेशांत कैदेत आहेत. पण परमेश्वर आठवण ठेवील. आता ते परदेशांत कैदेत आहेत. पण परमेश्वर त्यांना परत आणील. मग यहूदातील लोक, आपल्या मेंढ्यांना त्या कुरणांत चरु देतील. संध्याकाळी, ते अष्कलोनमधील रिकाम्या घरात आडवे होतील.
8 परमेश्वर म्हणतो, “यवाबच्या व अम्मोनच्या लोकांनी काय केले, ते मला माहीत आहे त्यांनी माझ्या माणसांना ओशाळवणे केले. माझ्या माणसांची जमीन काबीज करुन त्यांनी स्वत:च्या देशाचा विस्तार केला.
9 म्हणून, मी जिवंत आहे याची मला जेवढी खात्री आहे तेवढ्याच ठामपणाने मी वचन देतो की, सदोम व गमोरा यांच्यासारखाच मवाब व अमोन यांचा नाश होईल. मी सर्वशक्तिमान परमेश्वर आहे, मी इस्राएलचा देव आहे त्या देशांचा संपूर्ण कायमचा नाश होईल, असे मी वचन देतो. त्यांच्या देशांच्या जमिनीवर काटेकुटे माजतील. मृत समुद्रातील मिठाने व्यापलेल्या जमिनीप्रमाणे ते देश होतील. माझ्या माणसांतील जिवंत राहिलेली माणसे ती भूमी आणि त्या भूमीवर उरलेले सर्व काही घेतील.”
10 मवाब व अमोन येथील लोकांची अशी स्थिती होण्याचे कारण ते गर्विष्ठ होते. आणि सर्वशक्तिमान परमेश्वराच्या माणसांच्या बाबतीत त्यांनी क्रूरपणाने कृती केली. त्यांनी परमेश्वराच्या माणसांना कमीपणाने वागवले हेच होय.
11 ते लोक परमेश्वराला घाबरतील. का? कारम परमेश्वर त्यांच्या दैवतांचा नाश करील. मग दूरदूरच्या प्रदेशांतील सर्व लोक परमेश्वराची उपासना करु लागतील.
12 म्हणजे कूशींनो, (इथियोपियातील लोकांनो,) तुम्हीसुध्दा, बंर का? परमेश्वराची तलवार तुमच्या लोकांनाही मारील.
13 नंतर परमेश्वर उत्तरेकडे वळेल, अश्शूरला शिक्षा करील. तो निनवेचा नाश करील. ते शहर म्हणजे ओसाड, रुक्ष वाळवंट होईल.
14 तेथे फक्त मेंढ्या व वन्याप्राणी राहतील. शिल्लक राहिलेल्या खांबांवर घुबडे व कावळे बसतील. त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे बसतील. त्यांचा आवाज खिडक्यांतून ऐकू येईल. कावळे दारांच्या पायऱ्यांवर बसतील. त्या रिकाम्या घरांत काळे पक्षी जाऊन बसतील.
15 आता निनवेला फार गर्व झाला आहे. आता ती खरोखरच सुखी आहे. आता तेथील लोकांना, आपण अगदी सुरक्षित आहोत’ असे वाटते. त्यांना निनवे जगातील सर्वात महत्वाची वाटते. पण तिचा नाश होईल ती ओसाड होईल. तेथे फक्त वन्यपशूच विसाव्याला जातील. तिचा अतिशय वाईटरीतीने नाश झालेला पासून वाटसरु तेथून जाताना चुकचुकतील, निराशेने माना हलवतील.