बुद्धी


 • परमेश्वरा, तू मला जगण्याचा खरा मार्ग दाखवलोक माझ्यातल्या दुबळेपणाच्या शोधात असतात. म्हणून कसे जगावे ते तू मला दाखव.
  स्तोत्रसंहिता 5:8
 • परमेश्वरा तुझे मार्ग आत्मसात करण्यासाठी मला मदत कर. मला तुझे मार्ग शिकव. मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव तू माझा देव आहेस, माझा तारणारा आहेस मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो.
  स्तोत्रसंहिता 25:4, 5
 • तो दीन माणसांना त्यांचे मार्ग दाखवतो तो त्यांचे न्यायीपणाने नेतृत्व करतो.
  स्तोत्रसंहिता 25:9
 • परमेश्वरा, मला शत्रू आहेत म्हणून तू मला तुझे मार्ग शिकव. मला योग्य गोष्टी करायला शिकव.
  स्तोत्रसंहिता 27:11
 • परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे याविषयी मार्गदर्शन करीन. मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन.
  स्तोत्रसंहिता 32:8
 • परमेश्वर सैनिकाला सावधगिरीने चालण्यास मदत करतो. परमेश्वर त्याला पडण्यापासून सावरतो.
  स्तोत्रसंहिता 37:23
 • देवा, तू मला मार्ग दाखव तू मला चांगला उपदेश कर आणि नंतर तू मला गौरवाप्रत नेशील.
  स्तोत्रसंहिता 73:24
 • परमेश्वरा, माझे डोळे उघड मला तुझ्या शिकवणीकडे बघू दे आणि तू केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल वाचू दे.
  स्तोत्रसंहिता 119:18
 • परमेश्वरा, तुझे शब्द दिव्याप्रमाणे माझा मार्ग उजळतात.
  स्तोत्रसंहिता 119:105
 • जेव्हा लोक तुझा शब्द समजून घ्याला सुरुवात करतात तेव्हा ते त्यांना योग्य तऱ्हेने जीवन कसे जगायचे ते सांगणाऱ्या प्रकाशासारखे असते. तुझे शब्द अगदी साध्या लोकांना देखील शहाणे करतात.
  स्तोत्रसंहिता 119:130
 • परमेश्वरा, या सकाळी मला तुझे खरे प्रेम दाखव. माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी ज्या गोष्टी करायला हव्या त्या मला दाखव. मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले आहे.
  स्तोत्रसंहिता 143:8
 • परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस. तू जी प्रत्येक गोष्ट करशील ती करताना देवाचा विचार कर. म्हणजे तो तुला मदत करील.
  नीतिसूत्रे 3:5, 6
 • त्यांची शिकवण तुला जिथे जायचे असेल तिथे नेईल. तू झोपलास की ती तुझ्यावर लक्ष ठेवेल आणि तू जेव्हा उठशील तेव्हा ती तुझ्याशी बोलेल आणि तुला मार्ग दाखवील.
  नीतिसूत्रे 6:22
 • नंतर, जर तुम्ही चुकलात आणि चुकीच्या मार्गाने गेलात (डावीकडे वा उजवीकडे) तर तुमच्या मागून आवाज येईल, “हा मार्ग बरोबर आहे. तुम्ही ह्या मार्गाने जावे.”
  यशया 30:21
 • आंधळ्यांना कधीही माहीत नसलेल्या मार्गाने मी घेऊन जाईन. पूर्वी कधीही ते गेले नव्हते अशा स्थळी मी त्यांना नेईन. मी त्यांच्यासाठी अंधार प्रकाशात बदलीन. खडबडीत जमीन गुळगुळीत करीन. मी कबूल केलेल्या गोष्टी करीन. मी माझ्या लोकांचा त्याग करणार नाही.
  यशया 42:16
 • परमेश्वर, माझ्या प्रभूने, मला शिकविण्याची क्षमता दिली. तेव्हा आता या दु:खी लोकांना मी शिकवितो. रोज सकाळी तो मला उठवितो व विद्यार्थ्याप्रमाणे शिकवितो.
  यशया 50:4
 • परमेश्वर नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करील. ओसाड प्रदेशात तो तुमचा आत्मा तृप्त करील. तो तुमची हाडे मजबूत करील. भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल. सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही असाल.
  यशया 58:11
 • परमेश्वरा, माणसाच्या आयुष्यावर त्याचा स्वत:चा खरा हक्क नसतो, हे मला माहीत आहे. लोक भविष्याच्या योजना खरोखरच ठरवू शकत नाहीत.
  यिर्मया 10:23
 • ते लोक रडत परत येतील. पण मी त्यांचे नेतृत्व करीन व त्यांचे सांत्वन करीन. मी त्यांना सोप्या वाटेने नेईन म्हणजे ते अडखळणार नाहीत. मी त्याना अशाच मार्गाने नेईन कारण मी इस्राएलचा पिता आहे आणि एफ्राईम माझा पहिला मुलगा आहे.
  यिर्मया 31:9
 • आम्ही विश्वासाने जगतो, जे बघतो त्याने
  2 करिंथकरांस 5:7
 • कारण देवाचे वचन जिवंत आणि कार्य करणारे आहे आणि कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा अधिक धारदार आहे. ते आपला आत्मा, जीव, सांधे, आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे. ते अंत:करणाचे विचार व कल्पना यांचे परीक्षक असे आहे.
  इब्री लोकांस 4:12
 • यहोशाफाटने या न्यायाधीशांना सांगितले, “तुम्ही जे करायचे ते विचारपूर्वक करा. कारण लोकांसाठी नव्हे तर परमेश्वरासाठी तुम्ही न्याय करत आहात. तुमच्या निर्णयाला त्याची साथ असेल.
  2 इतिहास 19:6
 • ज्ञानासाठी ओरड आणि समजून घेण्यासाठी आवाज चढव. जर तू या गोष्टी केल्यास तर तू परमेश्वराला मान द्यायला शिकशील. तू खरोखरच देवाविषयी शिकशील. परमेश्वर ज्ञान देतो. ज्ञान आणि समज त्याच्या मुखातून येते.
  नीतिसूत्रे 2:3, 5, 6
 • लोक त्यांच्या योजना तयार करतात. पण परमेश्वरच त्या योजना प्रत्यक्षात आणतो.
  नीतिसूत्रे 16:1
 • वाईट लोकांना न्याय कळत नाही. पण जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना सर्वकाही कळते.
  नीतिसूत्रे 28:5
 • परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल. तो आत्मा त्याला सुज्ञपणा, समजूत, मार्गदर्शन आणि सामर्थ्य देईल. हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास व श्रध्दा ठेवण्यास त्या मुलाला शिकवील. परमेश्वराचे भय वाटण्यातच त्या मुलाला आनंद वाटेल. तो त्याच्या डोळ्यांना जे दिसते वा कानांनी जे ऐकू येते, त्याच्यावरून निर्णय घेणार नाही.हा मुलगा गोष्टी जशा दिसतात त्या वरून लोकांची पारख करणार नाही. तो जे ऐकेल त्यावरून लोकांची परीक्षा करणार नाही.
  यशया 11:2, 3
 • देवाने ह्या चौघांना सुज्ञपणा व निरनिराव्व्या प्रकारचे साहित्य व विज्ञान शिकण्याची क्षमता दिली होती. दानीएलला तर सर्व प्रकारच्या दृष्टांन्ताबद्दल व स्वप्नांबद्दल समजू शके.
  दानीएल 1:17
 • म्हणून जर तुमच्यातील कोणी शहाणपणात उणा असेल तर त्याने ते देवाकडे मागावे. जो सर्व लोकांना उदार हस्ते देतो, आणि जो दोष शोधीत नाही, असा देव ते त्याला देईल.
  याकोब 1:5
 • परमेश्वरा, या सकाळी मला तुझे खरे प्रेम दाखव. माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी ज्या गोष्टी करायला हव्या त्या मला दाखव. मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले आहे.
  स्तोत्रसंहिता 143:8
 • मी जे करावे असे तुला वाटते ते मला दाखव. तू माझा देव आहेस तुझे चांगले मन आत्मा मला साध्या देशात घेऊन जाऊ दे. परमेश्वरा, मला जगू दे, म्हणजे लोक तुझ्या नावाची स्तुती करतील. तू खरोखरच चांगला आहेस हे मला दाखव आणि माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.
  स्तोत्रसंहिता 143:10, 11
 • या शब्दांतली शिकवण शहाण्या माणसांनी सुध्दा अतिशय काळजीपूर्वक ऐकली पाहिजे, तरच ते अधिक शिकू शकतील आणि अधिक शहाणे होतील. आणि जे लोक चांगले वाईट ओळखण्यात तरबेज आहेत त्यांना अधिक चांगले समजू शकेल. त्या
  नीतिसूत्रे 1:5
 • मूर्ख माणसाला नेहमी स्वत:ची पध्दत सर्वश्रेष्ठ वाटते. पण विद्वान माणूस दुसरे लोक जे सांगतात तेही ऐकतो.
  नीतिसूत्रे 12:15
 • जर एखाद्याला पुरेशी माहिती मिळाली नाही तर त्याच्या योजना कोसळतील. पण जर एखाद्याने शहाण्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले तर तो यशस्वी होईल.
  नीतिसूत्रे 15:22
 • तुम्ही जे बोलता त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. जर तुम्ही चांगले बोललात तर तुमच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील. जर तुम्ही वाईट बोललात तर वाईट गोष्टी घडतील.
  नीतिसूत्रे 19:20
 • योजना आखण्या आधी चांगला सल्ला घ्या. तुम्हाला जर युध्द सुरु करायचे असेल तर मार्गदर्शनासाठी चांगल्या लोकांना शोधा.
  नीतिसूत्रे 20:18
 • युध्द सुरु करण्याआधी तुम्ही काळजीपूर्वक योजना आखली पाहिजे. तुम्हाला जर (युध्द) जिंकायचे असेल तर तुम्हाला अनेक चांगले मार्गदर्शक हवेत.
  नीतिसूत्रे 24:6
 • वरवर पाहून न्याय करु नका. तर खरोखर काय बरोबर आहे याची कसून शहानिशा करुन योग्य प्रकारे न्याय करा.”
  योहान 7:24
 • पण वरून लाभलेले शहाणपण मुळात शुद्ध, शातिदायक, समजूतदारपणाचे आणि मनमोकळे असून ते दयेचे व चांगली कामे यांना उत्तेजन देणारे असते. तसेच ते पक्षपात न करणारे व कळकळीचे असते.
  याकोब 3:17
 • ही माझी तुम्हांला भेटण्याची तिसरी वेळ आहे. ‘प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीने सिद्ध करावी.’
  2 करिंथकरांस 13:1