त्रास


 • पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.
  1 राजे 17:16
 • दुष्काळात देव तुला मृत्यूपासून वाचवेल आणि युध्दातही तो तुझे मृत्यूपासून रक्षण करेल.
  ईयोब 5:20
 • खूप लोक सापळ्यात अडकले आणि दुखी झाले कारण त्यांच्या पुढे असंख्य संकटे होती. संकटांच्या ओझ्याखाली ते लोक चेंगरले गेले आहेत. परमेश्वरा, त्यांना आश्रयदेणारी एक चांगली जागा तू बन. ज्या लोकांना तुझे नाव माहीत आहे ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. परमेश्वरा, जर लोक तुझ्याकडे आले, तर त्यांना मदत केल्याशिवाय परत पाठवू नकोस.
  स्तोत्रसंहिता 9:9, 10
 • परमेश्वर शुध्द माणसांचे आयुष्यभर रक्षण करतो त्यांचे वतन सदैव त्याच्याजवळ राहाते. संकटाच्यावेळी चागल्या माणसांचा नाश होणार नाही. भुकेच्या वेळा येतील तेव्हा त्यांच्याकडे खायला भरपूर अन्न असेल.
  स्तोत्रसंहिता 37:18, 19
 • मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे. आणि देवाने चांगल्या माणसांचा त्याग केल्याचे मी कधी पाहिले नाही चांगल्या माणसांची मुले अन्नासाठी भीक मागताना मी कधी पाहिली नाहीत.
  स्तोत्रसंहिता 37:25
 • देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे. आम्ही संकटकाळी त्याच्याजवळ नेहमीमदत शोधू शकतो. म्हणून जेव्हा भूकंप होतात आणि पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही. समुद्र जेव्हा खवळतो आणि पर्वत थरथर कापायला लागतात तेव्हा ही आम्हाला भीती वाटत नाही.
  स्तोत्रसंहिता 46:1-3
 • लोक हो! देवावर सदैव विश्वास ठेवा. तुम्ही देवाला तुमच्या सर्व समस्या सांगा. देव आपली सुरक्षित जागा आहे.
  स्तोत्रसंहिता 62:8
 • मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला, माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.”
  स्तोत्रसंहिता 91:2
 • देवाने खडक फोडला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले. वाळवटांत नदी वाहू लागली.
  स्तोत्रसंहिता 105:39-41
 • “मी तहानेलेल्यांसाठी पाण्याचा वर्षाव करीन. मी कोरड्या जमिनीवर झरे निर्माण करीन. मी तुझ्या संततीमध्ये माझा आत्मा घालीन. आणि वंशजांना आशीर्वाद देईन. ते वाहत्या पाण्याच्या झऱ्याप्रमाणे असतील.
  यशया 44:3
 • तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, आज आहे तर उद्या भट्टीत पडते, आशा रानफुलांना जर देव असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तुम्हांला घालणार नाही काय? चिंता करू नका आणि असे म्हणू नका की, ‘आम्ही काय खावे?’ किंवा ‘आम्ही काय प्यावे?’ किंवा ‘आम्ही काय पांघरावे?’
  मत्तय 6:30, 31
 • ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपणांस कोण वेगळे करील? त्रास, कष्ट, छळ, भूक, नग्नता, संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय? असे लिहिले आहे की,“दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत. आम्हांला कापायला नेत असलेल्या मेंढराप्रमाणे समजतात.” स्तोत्र. तरी या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आम्हांवर प्रीति केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवीत आहोत. कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्यकाळात, येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणांस देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करु शकणार नाही.
  रोमकरांस 8:35-39
 • आम्हांवर चारी दिशांनी संकटे येतात, पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, गोंधळलेलो आहोत, पण निराश झालो नाही. छळ झालेले असे आहोत पण टाकून दिलेले असे आम्ही नाही, खाली पडलेलो असलो तरी आमचा नाश झालेला नाही.
  2 करिंथकरांस 4:8, 9
 • तो स्त्री देवाने तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या ठिकाणाकडे पळून गेली. तेथे त्या स्त्रीची एक हजार दोनशे साठ दिवसकाळजी घेण्यात येईल.
  प्रकटीकरण 12:6