अर्थपूर्णता


  • सर्वशक्तिमान देव तुला वर आकाशातून व खली खोल दरीतून आशीर्वाद देवो तसेच स्तनांचा व गर्भाचा आशीर्वाद तो तुला देवो.
    उत्पत्ति 49:25
  • परंतु इस्राएल लोकांना पुष्कळ मुले झाली आणि त्यांची संख्या वाढत गेली; ते लोक महाप्रबल झाले आणि सर्व मिसर देश त्यांनी भरून गेला.
    निर्गम 1:7
  • तो तुमच्यावर प्रेम करील, तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमच्या राष्ट्राची तो वाढ करील. तो तुमच्या मुलाबाळांना आर्शीवाद देईल. तुमची शेते पिके तो आशीर्वादीत करील. तो तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षारस व तेल देईल. तुमची गाया बैले, वासरे मेंढ्या व कोंकरे ह्यांना तो आशीर्वाद देईल. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशात हे सर्व आशीर्वाद तो तुम्हाला देईल. इतरांपेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादीत व्हाल. प्रत्येक दांपत्याला मुलंबाळं होतील. गाई वासरांना जन्म देतील.
    अनुवाद 7:13, 14
  • देवाने मला माझ्या आईच्या शरीरात निर्माण केले आणि त्यानेच माझ्या गुलामांनाही घडवले. देवाने आपल्या सर्वांचीच आईच्या पोटात निर्मिती केली आहे.
    ईयोब 31:15
  • त्याचे वंशज पृथ्वीवर महान होतील. चांगल्या लोकाच्या वंशजांना खरोखरच आशीर्वाद लाभतील.
    स्तोत्रसंहिता 112:2
  • स्त्रीला मूळ होत नसेल तर देव तिला मुले देईल आणि तिला आनंदी करेल. परमेश्वराची स्तुती करा.
    स्तोत्रसंहिता 113:9
  • मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत. आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे. तरुण माणसाची मुले सैनिकाच्या भात्यातील बाणांसारखी आहेत.
    स्तोत्रसंहिता 127:3
  • परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते.
    स्तोत्रसंहिता 139:13
  • यरुशलेम, देव तुझे दरवाजे बुलंद बनवतो आणि देव तुझ्या शहरातल्या लोकांना आशीर्वाद देतो.
    स्तोत्रसंहिता 147:13
  • ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढ्या वळवतो त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या लोकांना वळवेल. परमेश्वर आपल्या हाताने (सामर्थ्याने) त्यांना एकत्र गोळा करील. तो लहान मेढ्यांना हातांत उचलून घेईल व त्या लहानग्यांच्या आया परमेश्वराच्या बाजूबाजूने चालतील.
    यशया 40:11
  • “मी तहानेलेल्यांसाठी पाण्याचा वर्षाव करीन. मी कोरड्या जमिनीवर झरे निर्माण करीन. मी तुझ्या संततीमध्ये माझा आत्मा घालीन. आणि वंशजांना आशीर्वाद देईन. ते वाहत्या पाण्याच्या झऱ्याप्रमाणे असतील. झऱ्याकाठी वाढणाऱ्या झाडांप्रमाणे ते जगातील लोकांत वाढतील.
    यशया 44:3, 4
  • “तू आईच्या गर्भात जन्म घेण्यापूर्वीपासून मला माहीत होतास. तू जन्माला येण्यापूर्वीच मी तुझी विशेष कामगिरीसाठी निवड केली. राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून मी तुझी निवड केली.”
    यिर्मया 1:5
  • प्रभूने तुला ज्या गोष्टी घडतील असे सांगितले त्यावर तू विश्वास ठेवलास म्हणून तू धन्य आहेस.”
    लूक 1:45
  • आपण दिलेल्या वचनाबाबत देव विश्वासू आहे हे जाणून सारा ही जरी वांझ होती आणि अब्राहामाचे वय लेकरे होण्याच्या अगदी मर्यादेपलीकडे गेले होते, तरी विश्वासाने मुलाला जन्म देण्याची शक्ति त्यांना मिळाली.
    इब्री लोकांस 11:11
  • परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. म्हणून त्याने माझी सुटका केली. तो मला सुरक्षित जागी घेऊन गेला.
    स्तोत्रसंहिता 18:19
  • देवा, माझे ऐक त्वरीत येऊन मला वाचव माझा खडक हो. माझे सुरक्षित स्थळ हो. माझा किल्ला हो. माझे रक्षण कर.
    स्तोत्रसंहिता 31:2
  • परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो. परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो.
    स्तोत्रसंहिता 34:7
  • परमेश्वरा, माझ्याकडे धाव घे आणि मला वाचव. परमेश्वरा लवकर ये आणि मला मदत कर.
    स्तोत्रसंहिता 40:13
  • प्रभु, मी केवळ एक गरीब, असहाय माणूस आहे. मला मदत कर. मला वाचव. माझ्या देवा, खूप उशीर करु नकोस.
    स्तोत्रसंहिता 40:17
  • देव म्हणतो, “इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा. मी तुम्हाला मदत करीन. आणि नंतर तुम्ही मला मान देऊ शकाल.”
    स्तोत्रसंहिता 50:15
  • मी कुठेही असलो कितीही अशक्त असलो तरी मी तुला मदतीसाठी हाक मारीन. तू मला अगदी उंचावरच्या सुरक्षित जागी घेऊन जा.
    स्तोत्रसंहिता 61:2
  • परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.
    स्तोत्रसंहिता 91:14
  • दुष्टांना खरोखरच शासन होईल. ही गोष्ट खरी आहे. आणि चांगल्या लोकांना सोडून देण्यात येईल.
    नीतिसूत्रे 11:21
  • परमेश्वर दुबळ्यांना सबळ व्हायला मदत करतो. तो लोकांना शक्तीशिवाय सामर्थ्यवान होण्यास कारणीभूत होतो. तरूण माणसे थकतात आणि त्यांना विश्रांतीची गरज वाटते. लहान मुलेसुध्दा अडखळतात आणि पडतात. पण परमेश्वरावर विश्वास ठेवणारे, ज्याप्रमाणे गरूड पंख पसरून वर उडतात, त्याप्रमाणे पुन्हा सामर्थ्यशाली होतात. ही माणसे न दमता धावतात व न थकता चालतात.
    यशया 40:29-31
  • स्त्रियांना बाळंतपणाचा त्रास कधीच होणार नाही. बाळंतपणात काय होईल ह्याची त्यांना भिती वाटणार नाही. परमेश्वर माझ्या सर्व लोकांना व त्यांच्या मुलांना आशीर्वाद देईल.
    यशया 65:23
  • “कळा आल्याशिवाय बाई मुलाला जन्म देत नाही. आपण जन्म दिलेल्या मुलाला पाहण्यासाठी बाईला कळा सहन कराव्या लागतात. त्याचप्रमाणे कोणीही नव्या जगाचा आरंभ एका दिवसात झालेला पाहिला नाही. एक दिवसात नवीन राष्ट्र उभे राहिल्याचे कोणीही ऐकलेले नाही. राष्ट्राला प्रथम प्रसूतिवेदनांसारख्या वेदना व्हाव्याच लागतात. प्रसूतिवेदनानंतर सियोन तिच्या मुलांना जन्म देईल. त्याचप्रमाणे मी सुध्दा नवीन निर्मिती होऊ न देता वेदना होऊ देणार नाही.”परमेश्वर पुढे म्हणतो, “जर मी तुम्हाला प्रसूतिवेदना दिल्या तर तुम्हाला नवीन राष्ट्र मिळाल्याशिवाय राहणार नाही असे मी तुम्हाला वचन देतो.” तुमचा देव असे म्हणाला. .
    यशया 66:7, 9
  • जन्म देणाऱ्या स्त्रीला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते. पण जेव्हा बाळ जन्मते तेव्हा ती सर्व वेदना विसरते. कारण एक बाळ या जगात जन्म घेते.
    योहान 16:21
  • जे मनुष्याला सामान्य नाही अशा कोणत्याही मोहाने तुम्हाला पकडले नाही. परंतु देव विश्वासनीय आहे. तुम्हांला सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या मोहाबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हांला सहन करणे शक्य होईल.
    1 करिंथकरांस 10:13
  • पण तो मला म्हणाला, “माझी कृपा तुला पुरे, कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते.” म्हणून मी माझ्या अशक्तपणाबद्दल आनंदाने प्रौढी मिरवीन. यासाठी की ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर स्थिर राहावे.
    2 करिंथकरांस 12:9
  • जे चांगले आहे ते करण्याचा आपण कंटाळा करु नये. कारण आपणआळस केला नाही, तर योग्य वेळी आपणांस आपले पीक मिळेल.
    गलतीकरांस 6:9
  • जो ख्रिस्त मला सामर्थ्य देतो त्याच्यार द्धारे मी सर्व परिस्थितीचा सामना करु शकतो.
    फिलिप्पैकरांस 4:13
  • परंतु स्त्रिया जर विश्वास, प्रीती, पवित्रता व योग्य आत्मसंयमनात राहिल्या तर बालकाला जन्म देण्यामुळे त्यांचे तारण होईल.
    1 तीमथ्याला 2:15