शिस्त लावणे


 • का? कारण परमेश्वर ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच सुधारतो. होय, मुलावर प्रेम करणाऱ्या व त्याला शिक्षा करणाऱ्या बापासारखा देव आहे.
  नीतिसूत्रे 3:12
 • जर एखाद्याचे आपल्या मुलांवर खरोखच प्रेम असेल तर तो त्यांचे चुकल्यावर त्यांना काठीने मारायलाही कमी करणार नाही. ते चुकीने वागल्यावर तो त्यांना शिस्त लावेल. जर तुमचे तुमच्या मुलावर प्रेम असेल तर तुम्ही त्याला योग्य वेळी काळजीपूर्वक शिकवाल.
  नीतिसूत्रे 13:24
 • दोन बलवान माणसे वाद घातल असली तर तो वाद चिठ्ठ्या टाकून सोडवणे चांगले
  नीतिसूत्रे 19:18
 • मुले मूर्खपणाच्या गोष्टी करीत असतात. पण तुम्ही जर त्यांना शिक्षा केली तर त्या गोष्टी न करायलाही ते शिकतील.
  नीतिसूत्रे 22:15
 • गरज पडेल तेव्हा मुलाला नेहमी शिक्षा करा. तुम्ही त्याला चापट मारली तर त्याला ती लागणार नाही.
  नीतिसूत्रे 23:13
 • वडिलांनो, आपल्या मुलाला चिडवू नका, म्हणजे ते निराश होणार नाहीत.
  कलस्सैकरांस 3:21
 • तो पैशावर प्रेम करणारा नसावा. त्याने त्याच्या कुटुंबाचा चांगला पुढारी असावे आणि त्याने त्याची लेकरे त्याच्या आज्ञेत ठेवावीत.
  1 तीमथ्याला 3:4
 • ज्याच्याकडून तुम्हांला उत्तेजन मिळेल असा जो शब्द (मुले) तुम्हाला उद्देशून वापरण्यात आला आहे त्याचा कदाचित तुम्हाला विसर पडलेला दिसतो:“माइया मुला, प्रभूच्या शिस्तीचा अनादर करू नको, आणि जेव्हा तो तुला ताळ्यावर आणतो, तेव्हा तू धीर सोडू नको कारण ज्याच्यावर प्रभु करतो, त्यांना तो शिस्त लावतो आणि ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो, त्यांना तो शिक्षा करतो.” हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन कर. ते असे दर्शविते की, देव तुम्हांला मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत? जर तुम्हांला शिस्त लावलेली नाही तर जसा इतर सर्व मुलांचा अनुभव असतो तसे तुम्ही अनौरस मुले आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही. याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हाला शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या किती तरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे?
  इब्री लोकांस 12:5-9
 • -मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हाला परमेश्वराला कसा मान द्यायचा ते शिकवीन.
  स्तोत्रसंहिता 34:11
 • तरुण माणूस शुध्द आयुष्य कसे जगू शकेल? तू दिलेली शिकवण आचरणात आणून.
  स्तोत्रसंहिता 119:9
 • परमेश्वरा, तू कबूल केलेल्या वस्तू मला दे. परमेश्वरा, तुझे खरे प्रेम सदैव असते. परमेश्वरा, तू आमची निर्मिती केलीस, आता आम्हाला सोडू नकोस.
  स्तोत्रसंहिता 138:8
 • आमची तरुण मुले बळकट झाडांसाखी आहेत. आमच्या मुली राजवाड्यातल्या सुंदर सजावटीप्राणे आहेत.
  स्तोत्रसंहिता 144:12
 • मुला, माझी शिकवण विसरु नकोस. मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या लक्षात ठेव.
  नीतिसूत्रे 3:1
 • “मुलांनो, आता माझे ऐका, जर तुम्ही माझा मार्ग अनुसरला तर तुम्हीही आनंदी व्हाल. माझी शिकवण ऐका आणि शहाणे व्हा. ऐकायला नकार देऊ नका.
  नीतिसूत्रे 8:32-33
 • लहान मुलाला जगण्याचा योग्य मार्ग लहानपणीच शिकवा. मग तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याच मार्गांने जगेल.
  नीतिसूत्रे 22:6
 • तुझी मुले देवाला अनुसरतील. आणि तो त्यांना शिक्षण देईल. मग तुझ्या मुलांना खरोखरच शांतता मिळेल.
  यशया 54:13
 • मग जेव्हा त्यांनी खाणे संपविले, येशू पेत्राला म्हणाला, “योहानाच्या मुला, शिमोना, तू माझ्यावर या सर्वापेक्षा अधिक प्रीति करतोस काय?”तो म्हणाला, “होय प्रभु, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.”येशू म्हणाला, “माझ्या कोकरांना चार.”
  योहान 21:15
 • पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ जे प्रभूला शुद्ध अंत:करणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीति आणि शांति यांच्या मागे लाग.
  2 तीमथ्थाला 2:22
 • माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून जितका आनंद मला होतो तितका कशानेही होत नाही.
  3योहान 1:4
 • त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकावा. घरी, दारी, झोपता-उठताना, त्याविषयी बोलत राहा.
  अनुवाद 6:7
 • मी दिलेल्या या सर्व आज्ञांचे पालन काळजीपूर्वक करा. जे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टिने चांगले व उचित आहे ते केल्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.
  अनुवाद 12:28
 • मोशे लोकांना म्हणाला, “मी ज्या गोष्टी आज सांगतो त्या लक्षपूर्वक ऐका. आपल्या मुलाबाळांनाही या नियमशास्त्राचे काटेकोरपणे पालन करायला सांगा. 4त्यांचे महत्व कमी लेखू नका. या आज्ञांवरच तुमचे जीवन अंवलबूंन आहे. त्यायोगेच तुम्ही आपल्याला मिळणार असलेल्या त्या यार्देन नदीपलीकडच्या प्रदेशात दीर्घकाळ वास्तव्य कराल.”
  अनुवाद 32:46, 47
 • आणि माझ्या वडिलांनी मला शिकवले. ते मला म्हणाने, “मी जे सांगतो ते लक्षात ठेव. माझ्या आज्ञा पाळ. म्हणजे तू जिवंत राहाशील. ज्ञान आणि समजूतदारपणा मिळव. माझे शब्द विसरु नकोस. माझ्या शिकवणुकीप्रमाणे वाग.
  नीतिसूत्रे 4:4, 5
 • चांगला माणूस चांगले आयुष्य जगतो आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद मिळतात.
  नीतिसूत्रे 20:7
 • सगळी परिस्थिती मी डोळ्याखालून घातली. आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, “आपल्या शत्रूची धास्ती बाळगू नका. लक्षात ठेवा, आमचा प्रभु, परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद मुलगे, मुली यांच्याकरता तुम्ही लढा दिला पाहिजे, आपल्या बायका आणि घरेदारे यांच्यासाठी लढले पाहिजे.”
  नहेम्या 4:14
 • आणि वडिलांनो, आपल्या मुलांना राग येईल असे करु नका. उलट, देवापासून जी माहिती व शिक्षण येते त्यान त्यांना वाढवा.
  इफिसकरांस 6:4
 • माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांवर सोपवून दे.
  2 तीमथ्थाला 2:2