प्रेम


  • सारांश, या तीन गोष्टी राहतात:विश्वास, आशा आणि प्रीति पण यातील सर्वांत महान प्रीति आहे.
    1 करिंथकरांस 13:13
  • येशूने उत्तर दिले, प्रभु तुमचा देव याजवर प्रीति करा. तुम्ही त्याजवर पूर्ण हृदयाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने प्रीती करा.’ ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे:‘जशी आपणावर तशी इतरांवर प्रीति करा. सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.”
    मत्तय 22:37-40
  • होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे.
    योहान 3:16
  • सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की, एकमेकांवर सत्याने प्रेम करा. कारण प्रेम पापाच्या राशीवर पांघरुण घालते.
    1 पेत्र 4:8
  • अशा रीतीने ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वत:चा जीव दिला. यामुळे प्रेम काय आहे तेआपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहेआणि त्याचा भाऊ गरजेत आहे हे तो पाहतो पण तरीही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहतेअसे आपण कसे म्हणू शकतो? प्रिय मुलांनो, आपली प्रीति केवळ शब्दांनी बोलण्याएवढीच मर्यादित नसावी तर ती कृतीसहीत व खरीखुरी असावी.
    1 योहान 3:16-18
  • प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीति करु या, कारण प्रीती देवाकडून येते, आणि प्रत्येकजण 8 जो प्रीति करतो तोदेवाचे मूल होतो आणि देवाला ओळखतो. जो प्रीति करीत नाही, त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही. कारण देव प्रीतिआहे.
    1 योहान 4:7, 8
  • कारणसंपूर्णनियमशास्त्राचा सारांश एकाच वचनात सामावला आहे. ते सांगते, “जसे आपणांवर तसे आपल्या सोबतीच्या व्यक्तीवरही प्रेमकरा.”
    गलतीकरांस 5:14
  • “जर तुम्ही माझ्यावर प्रीति करित असाल, तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल.
    योहान 14:15
  • “मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हांला खरे सांगतो:येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.
    मत्तय 25:40
  • “यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्या असे तुम्हांला वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा. कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टेयांच्या शिकवणीचे सार हेच आहे.(लूक 13:24)
    मत्तय 7:12
  • एकमेकांचे सहन करा. जशी प्रभुने तुम्हांला क्षमा केली तशी एखाद्याविरुद्ध तक्रार असेल तर एकमेकांना क्षमा करा. या सर्वांवर प्रीतिचे वस्त्र परिधान करा. जे त्या सर्वांना एकत्र ठेवते आणि त्यांना परिपूर्ण करते.
    कलस्सैकरांस 3:13, 14
  • धैर्यशील व्हा. सशक्त व्हा. प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल ती प्रीतीत करा.
    1 करिंथकरांस 16:14
  • आपल्या मित्रासाठी मरावे, यापेक्षा कोणाचीही प्रीति मोठी नाही.
    योहान 15:13
  • आम्ही प्रीति करतो कारण देवाने आमच्यावर पहिल्यांदा प्रीति केली.
    1 योहान 4:19
  • कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्यकाळात, येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणांस देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करु शकणार नाही.
    रोमकरांस 8:38, 39
  • ‘मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. जशी मी तुम्हांवर प्रीति केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीति करा. तुमची एकमेकांवर प्रिति असली तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”
    योहान 13:34, 35
  • ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो, तो असा आहे की जो माझ्यावर प्रीति करतो, त्याच्यावर पिता प्रीति करील. मीसुद्धा त्याच्यावर प्रीति करीन आणि स्वत:ला त्याच्यासाठी प्रगट करीन.” मग यहूदा (यहूदा इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “पण प्रभु, तू आम्हांसमोर स्वत:ला का प्रगट करणार आहेस आणि जगासमोर का नाही?” येशूने उत्तर दिले, “जर कोणी माझ्यावर प्रीति करतो तर तो माझी शिकवण पाळील, माझा पिता त्याच्चावर प्रीति करील. आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्याबरोबर राहू. जो माझ्यावर प्रीति करीत नाही, तो माझी शिकवण पाळणार नाही. हे शब्द जे तुम्ही ऐकता ते माझे नाहीत. ज्या पित्याने मला पाठविले त्याचे हे शब्द आहेत.”
    योहान 14:21-24
  • तुमची प्रीति प्रामाणिक असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा व बऱ्याला चिकटून राहा.
    रोमकरांस 12:9
  • प्रिय मित्रांनो, जर देवाने आमच्यावर अशा प्रकारे प्रीति केली तर आम्ही एकमेकांवर प्रीति केलीच पाहिजे.
    1 योहान 4:11
  • आम्हांलाख्रिस्ताकडून ही आज्ञा मिळाली आहे:जो देवावर प्रीति करतो त्याने त्याच्या भावावर प्रीति केलीच पाहिजे.
    1 योहान 4:21
  • आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा.
    अनुवाद 6:5
  • “आता, हे इस्राएल लोकांहो तुमच्या परमेश्वराची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे ते आता ऐका. परमेश्वराची अशी इच्छा आहे की तुम्ही त्याचा मान राखावा आणि तो म्हणतो त्याप्रमाणे करावे तुम्ही त्याच्यावर प्रेम करावे आणि संपूर्ण अंत:करणाने व जीवाने त्याची सेवा करावी.
    अनुवाद 10:12
  • तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा. त्याच्या आज्ञा पाळा. त्याला सोडू नका. कारण परमेश्वर म्हणजेच जीवन. तसे केलेत तर अब्राहाम, इसहाक, व याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे परमेश्वर तुम्हांला त्या प्रदेशात दीर्घायुष्य देईल.”
    अनुवाद 30:20
  • पण तुम्ही परमेश्वराला मानले पाहिजे. मनापासून त्याचीच सेवा केली पाहिजे. त्याने तुमच्यासाठी जे चमत्कार केले ते आठवले पाहिजेत.
    1 शमुवेल 12:24
  • मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही. 9 त्यामुळे माझे ह्दय आणि माझा आत्मा आनंदीत राहील माझे शरीरही सुरक्षित असेल.
    स्तोत्रसंहिता 16:8, 9
  • हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते. त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे. 2 माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?
    स्तोत्रसंहिता 42:1, 2
  • देवा, तू माझा देव आहेस आणि तू मला खूप हवा आहेस. माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क, बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.
    स्तोत्रसंहिता 63:1
  • माझा आत्मा तुला धरुन ठेवतो आणि तू माझा हात धरतोस.
    स्तोत्रसंहिता 63:8
  • देवा, स्वर्गातही तू माझ्याजवळ असशील आणि जेव्हा तू जवळ असशील तेव्हा या पृथ्वीवरचे मला आणखी काय हवे असणार? 26 कदचित् माझ्या शरीराचा आणि मनाचा नाश होईल परंतु माझ्याजवळ मला आवडत असलेला खडक आहे. देव सदैव माझ्याजवळ असतो.
    स्तोत्रसंहिता 73:25, 26
  • देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो. देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो.
    स्तोत्रसंहिता 107:9
  • परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो ते मला खूप आवडते. 2 मी त्याला मदतीसाठी हाक मारतो आणि ती तो ऐकतो ते मला खूप आवडते.
    स्तोत्रसंहिता 116:1, 2
  • डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय होईल.
    मत्तय 6:22
  • तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हांला मिळतील.
    मत्तय 6:33
  • ज्याने ज्याने माझ्या मागे येण्याकरिता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्याला त्यापेक्षा कितीतरी जास्तापटीने लाभ होईल व त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.
    मत्तय 19:29
  • तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्यावचून त्याच्याने फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हांला फळ देता येणार नाही.
    योहान 15:4
  • ज्या वरील (स्वर्गातील) गोष्टी आहेत त्याबद्दलचा विचार करा. ज्या गोष्टी पृथ्वीवरच्या आहेत त्यांचा विचार करु नका.
    कलस्सैकरांस 3:2
  • देवाप्रती असलेली आमची प्रीति आम्ही त्याच्या आज्ञापालनाकडून दाखवूशकतो आणि त्याच्या आज्ञा फार अवजड नाहीत.
    1योहान 5:3