विश्वास


 • म्हणून जे ऐकले त्याचा परिणाम विश्वास आणि जेव्हा कोणी येशूविषयी उपदेश केला.
  रोमकरांस 10:17
 • परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस. तू जी प्रत्येक गोष्ट करशील ती करताना देवाचा विचार कर. म्हणजे तो तुला मदत करील.
  नीतिसूत्रे 3:5, 6
 • मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहिले.
  मार्क 9:23
 • म्हणून, जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी उत्पत्ति आहे. जुने गेल आहे. नवीन आले आहे!
  2 करिंथकरांस 5:17
 • कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.”
  लूक 1:37
 • मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या बाबतीत घडो.”
  मत्तय 9:29
 • आता विश्वास म्हणजे, आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरंवसा असणे.
  इब्री लोकांस 11:1
 • म्हणून जर तुमच्यातील कोणी शहाणपणात उणा असेल तर त्याने ते देवाकडे मागावे. जो सर्व लोकांना उदार हस्ते देतो, आणि जो दोष शोधीत नाही, असा देव ते त्याला देईल. पण त्याने विश्वासाने मागितले पाहिजे व संशय धरू नये. कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे इकडेतिकडे हेलकावणाऱ्या समुद्रातील लाटेसारखा आहे. अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्याला काही प्राप्त होईल. कारण तो द्विधा आहे आणि तो जे करतो त्या सर्वांत तो अस्थिर आहे.
  याकोब 1:5-8
 • आणि विश्वासाशिवाय देवाला संतोषविणे अशक्य आहे. कारण जो कोणी देवाकडे येतो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की देव आहे आणि जे त्याला शोधतात त्यांना तो बक्षीस देतो.
  इब्री लोकांस 11:6
 • म्हणून, ज्याप्रमाणे शरीर हे आत्म्याशिवाय मेलेले आहे, त्याचप्रमाणे विश्वास हा कृत्यांवाचून मेलेला असा आहे.
  याकोब 2:26
 • जर तो पुढे जाऊन आपण हे टाळावे असा विश्वास ठेवूनखातो तो देवासमोर दोषी ठरतो. कारण त्याची कृति विश्वासावर आधारित नाही, ते पाप आहे.
  रोमकरांस 14:23
 • परंतु माझा धार्मिक पुरुष विश्वासाने वाचेल आणि जर तो पाठ फिरवील तर माझ्या जिवाला संतोष होणार नाही.”
  इब्री लोकांस 10:38
 • देवाने मला मारुन टाकले तरी मी देवावरच विश्वास ठेवीन. पण मी त्याच्या समोर माझा बचाव करीन.
  ईयोब 13:15
 • परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो, “तुम्ही मला शरण आलात, तर तुम्ही वाचाल. शांतता आणि विश्वास हीच तुमची शक्ती आहे.”पण तुम्हाला हेच नको आहे.
  यशया 30:15
 • जरी आम्ही अविश्वासू आहोत तरी तो अजूनही विश्वासू आहे कारण तो स्वत:ला नाकारु शकत नाही.
  1तीमथ्याला 2:13
 • कारण प्रत्येकजण जो देवाचा मूल होतो तो जगावर विजय मिळवितो,आणि यामुळे आम्हांला जगावर विजय मिळाला:आमच्या विश्वासाने.
  1 योहान 5:4
 • या सर्व गोष्टींबरोबर ढाल म्हणून विश्वास घ्या. ज्यामुळे त्या दुष्टाने मारलेले सर्व जळते बाण तुम्हांला विझविणे शक्य होईल.
  इफिसकरांस 6:16
 • तेव्हा तो म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला म्हणू शकता, येथून निघून तेथे जा, तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही.”
  मत्तय 17:20
 • जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या सिंहासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
  इब्री लोकांस 12:2
 • ज्याअर्थी विश्वासाने आपल्याला नीतिमात ठरविले आहे त्याअर्थी आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडून शांति मिळाली आहे.
  रोमकरांस 5:1
 • पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन यांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल.
  मार्क 11:22
 • वेगवेगळ्या प्रकारच्या पिडांनी काही काळापर्यंत तुम्ही दु:खी होणे जरी जरुरीचे असले, तरी यामुळे आनंद करीत आहा. नाशवंत सोने शुध्द करण्याकरिता अग्नित टाकले जाते. त्याहून अधिक मौल्यवान अशा तुमच्या विश्वासाची कसोटी व्हावी, आणि येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या वेळी तो खरा ठरावा आणि तुम्हाला स्तुति, गौरव व सन्मान मिळावा याची आवश्यकता आहे. जरी तुम्ही येशूला पाहिले नाही, तरी तुम्ही त्याच्यावर प्रीति करता. जरी आता तुम्ही त्याच्याकडे पाहू शकत नसला तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही व्यक्त करता येणार नाही, अशा गौरवी आनंदाने भरला आहात. तुमच्या विश्वासाचे ध्येय जे तुमच्या आत्म्याचे तारण ते तुम्हाला प्राप्त होत आहे.
  1 पेत्र 1:6-9