कायदेशीर अडचणी


  • येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमास आले तेव्हा मंदिराचा कर वसूल करणारे आले, ते पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरू कराचा रूपया देत नाही काय?” त्याने म्हटले, होय देतो. मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्याअगोदर येशू म्हणाला, शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात, आपल्या मुलांकाडून की परक्याकडून?” जेव्हा तो म्हणाला, “परक्याकडून” तेव्हा येशूने त्याला म्हटले, तर मग मुले मोकळी आहेत. तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून पाण्यात जाऊन गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रूपयांचे एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल दे.”
    मत्तय 17:24-27
  • म्हणून तुमचे मत आम्हांला सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला. ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहेत? कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले. तेव्हा येशूने विचारले, या नाण्यावर कोणाचे चित्र आहे? आणि या नाण्यावर कोणाचे नाव लिहिलेले आहे?” त्या लोकांनी उत्तर दिले, त्यावर कैसराचे चित्र व नाव दिले आहे.” यावर येशू त्यांना म्हणाला, जे कैसराचे आहे ते कैसराला द्या. आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या!”
    मत्तय 22:17-21
  • जरी विदेशी लोक तुमच्यावर टीका करतात आणि अपराध केल्याबद्दल दोष देतात तरी तुम्ही आपले वागणे इतके चांगले ठेवा की, तुमची चांगली कामे पाहून विदेशी लोकांनी देवाच्या परत येण्याच्या दिवशी त्याला गौरव द्यावे. प्रभुकरिता प्रत्येक मानवी अधिकाऱ्याच्या अधीन असा. राजाच्या अधीन असा, जो सर्वोच्च अधिकारी आहे आणि राज्यपालांच्या अधीन असा. कारण अयोग्य करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आणि चांगली कामे करणाऱ्यांना शाबासकी देण्यासाठी प्रान्ताधिपतीने त्यांना पाठविले आहे.
    1 पेत्र 2:12-14
  • वाटेत तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी लगेच सलोखा कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाकडे नेईल व न्यायाधीश अधिकाऱ्याकडे नेईल आणि अधिकारी तुला तरुंगात टाकील. मी तुला खरे सांगतो तू शेवटचा पैसा देईपर्यंत तुझी सुटका मुळीच होणार नाही.
    मत्तय 5:25-26
  • माझ्यामुळे ते तुम्हांला राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व यहूदीतर लोकांसमोर माझ्याविषयी सांगाल. जेव्हा तुम्हांला अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. त्यावेळेला तुम्ही काय बोलायचे ते सांगितले जाईल.
    मत्तय 10:18, 19
  • एकमेकांवर प्रीति करण्याशिवाय कोणाच्याही ऋणात राहू नका. कारण जो इतरांवर प्रीति करतो, त्याने नियमशास्त्र पाळले आहे.
    रोमकरांस 13:8
  • पिलात म्हणाला, “तू माझ्याशी बोलण्यास नकार देतोस काय? तुला वधस्तंभावर खिळण्याची किंवा मुक्त करण्याची ताकद मला आहे, हे तुला समजत नाही का?” येशूने उत्तर दिले, “जर वरून अधिकार देण्यात आला नसता, तर तुला माझ्यावर अधिकार नसता. म्हणून ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले तो महान पापाचा दोषी आहे.”
    योहान 19:10, 11
  • त्या दिवसात कैसर औगुस्तकडून हुकुम झाला की, रोमन जगातील सर्व लोकांच्या नावांची नोंद झालीच पाहिजे. ही पहिली नावनोंदणी होती. क्वीरीनिय हा सूरिया प्रांताचा राज्यपाल होता त्यावेळेस ही नावनोंदणी झाली. प्रत्येक जण नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या गावी गेला. मग योसेफसुद्धा गालीलातील नासरेथ गावाहून यहूदीयातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला. कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. जिच्याशी त्याचे लग्न ठरले होते व जी गरोदर होती, त्या मरीयेसह तो तेथे नावनोंदणी करण्यासाठी गेला.
    लूक 2:1-5
  • हे बघा! राष्ट्र हा परमेश्वराच्या सृष्टीचा फार सूक्ष्म अंश आहे. राष्ट्र हे बादलीतल्या पाण्याच्या एका थेंबाप्रमाणे आहे. जर परमेश्वराने सर्व राष्ट्रे गोळा करून त्याच्या तराजूच्या पारडयात टाकली तर ती धुळीच्या लहान लहान कणांप्रमाणे दिसतील. तुलनेने देवापुढे जगातील सर्व राष्ट्रे म्हणजे काहीच नाहीत. देवाच्या तुलनेत जगातील सर्व राष्ट्रांची किंमत शून्य आहे.
    यशया 40:15, 17
  • कारण माइयासाठी मोठे आणि परिणामकारक दार उघडले आहे. आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात.
    1 करिंथकरांस 16:9
  • प्रत्येकाने वरिष्ठ अधिकान्याच्या अधीन असावे, कारण देवाने नेमल्यावाचून अधिकार स्थापित होत नाही व जे आहोत ते देवाने नेमलेले आहेत. परिणामी, जो अधिकाऱ्याला विरोध करतो, तो स्वत:ला जे देवाने आज्ञापिले आहे त्याला विरोध करतो व जे देवाच्या आज्ञेस विरोध करतात ते स्वत:वर न्याय ओढवून घेतील. अधिकारी चांगल्या कृत्यांसाठी नाही तर वाईट कृत्यांसाठी धाक असतात. तुला अधिकाऱ्याची भीति वाटू नये काय? चांगले ते कर म्हणजे तुझी प्रद्दांसा होईल. होय, तो तुझे चांगले करणारा देवाचा सेवक आहे, परंतु वाईट करशील तर त्याची भीति बाळग, कारण तो तलवार व्यर्थ बाळगीत नाही. त्याचे वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा तो देवाचा सेवक आहे. यासाठी देवाचा राग जो केवळ शिक्षेद्वारे प्रगट होतो त्याच्यामुळे नव्हे, तर तुझ्या सद्सदविवेकबुध्दीने अधीन राहणे आवश्यक आहे. आणि त्यामुळेच तुम्ही कर देता. कारण ते देवाचे अधिकारी आहेत. व हेच काम ते करतात. तू ज्यांचा ऋणी आहेस त्यांचे देणे देऊन टाक. ज्यांना कर द्यावयाचा त्यांना कर दे. ज्यांना जकात द्यावयाची त्यांना जकात दे. ज्यांचा धाक धरायचा त्यांचा धाक धर. ज्याला मान द्यायचा त्याला मान दे
    रोमकरांस 13:1-7