उत्क्रांती विरुद्ध जगाच्या निर्मितीपासून
-
देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली.
उत्पत्ति 1:1 -
मग देव बोलला, “जलामध्ये जीवजंतूचे थवेच्या थवे उत्पन्न होवोत. आणि पृथ्वीवर आकाशात पक्षी उडोबागडोत”
उत्पत्ति 1:20 -
समुद्रातील प्रचंड जलचर म्हणजे पाण्यात फिरणारे व अनेक जातीचे व प्रकारचे जलप्राणी देवाने उत्पन्न केले. तसेच आकाशात उडणारे निरनिराळड्या जातीचे पक्षीही देवाने उत्पन्न केले आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
उत्पत्ति 1:21 -
मग देव बोलला, “निरनिराळया जातीचे पशू, मोठे प्राणी वेगवेगळड्या जातीचे सरपटणारे व रांगणारे लहान प्राणी असे जीवधारी प्राणी पृथ्वीवर उत्पन्न होवोत. ते आपापल्या जातीचे अनेक प्राणी निर्माण करोत.” आणि तसे सर्व झाले.
उत्पत्ति 1:24 -
मग देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करु; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील.”
उत्पत्ति 1:26 -
तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली.
उत्पत्ति 1:27 -
नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला.
उत्पत्ति 2:7 -
कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्व काही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा विसाव्याचा विशेष दिवस म्हणून आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.
निर्गम 20:11 -
“तुम्ही प्राण्यांना विचारा, ते तुम्हाला शिकवतील किवा हवेत उडणाऱ्या पक्ष्यांना विचारा ते तुम्हाला सांगतील. किंवा पृथ्वीला विचारा, ती तुम्हाला शिकवेल. समुद्रातल्या माशांना त्यांचे शहाणपण सांगू द्या. या सर्व गोष्टी देवाने निर्माण केल्या आहेत हे सर्वांना ठाऊक आहे.
ईयोब 12:7-9 -
“देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे. देव आपल्याला न काळणाऱ्या महान गोष्टी करत असतो.
ईयोब 37:5 -
“ईयोब, तू बेहेमोथ कडे बघ. मी (देवाने) तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले. बेहेमोथ गायीसारखे गवत खातो. बेहेमोथच्या अंगात बरीच शक्ती आहे. त्याच्या पोटातले स्नायू खूप बळकट आहेत. बेहेमोथची शेपटी देवदाराच्या झाडासारखी उभी राहते. त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत. “बेहेमोथची हाडे पितळेसारखी बळकट आहेत. त्यांचे पाय म्हणजे जणू लोखंडाच्या कांबी.
ईयोब 40:15-18 -
उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या सर्व गोष्टी तूच निर्माण केल्यास ताबोर पर्वत आणि हार्मोन पर्वत तुझ्या नावाचा जयजयकार करतात.
स्तोत्रसंहिता 89:12 -
देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा, तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील.
स्तोत्रसंहिता 90:2 -
पण परमेश्वरा, तू जेव्हा तुझा आत्मा पाठवतोस तेव्हा ते सशक्त होतात आणि तू जमीन पुन्हा नव्या सारखी करतोस.
स्तोत्रसंहिता 104:30 -
परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा. का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.
स्तोत्रसंहिता 148:5 -
परमेश्वराने, खऱ्या देवाने या गोष्टी सांगितल्या: (परमेश्वराने आकाश निर्माण केले. परमेश्वराने ते जगावर पसरले. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट त्यानेच निर्माण केली. पृथ्वीवरील सर्व लोकात त्याने प्राण घातला, चालणाऱ्या प्रत्येक माणसात चैतन्य घातले.)
यशया 42:5 -
मी प्रकाश निर्माण केला आणि अंधारही. मी शांती निर्माण केली तशी संकटेही. मी परमेश्वर आहे व ह्यासर्व गोष्टी मी करतो.
यशया 45:7 -
म्हणून पाहा! मी पृथ्वी व तीवर राहणारी सर्व माणसे निर्माण केली. मी माझ्या हाताने आकाश केले, आणि मी आकाशातील सर्व सैन्यांवर हुकूमत ठेवतो.
यशया 45:12 -
परमेश्वरच फक्त देव आहे. त्यानेच आकाश व पृथ्वी निर्मिली. परमेश्वराने पृथ्वीला तिच्या जागी ठेवले. परमेश्वराने पृथ्वी निर्मिली तेव्हा त्याला ती रिकाती नको होती. ती पुढे जगावी म्हणून त्याने ती निर्मिली. तिच्यावर राहता यावे म्हणून त्याने ती निर्माण केली “मीच परमेश्वर आहे दुसरा कोणीही देव नाही.
यशया 45:18 -
“मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करीन. लोक भूतकाळाची आठवण ठेवणार नाहीत. त्यांना त्यातील एकही गोष्ट आठवणार नाही.
यशया 65:17 -
आमचा पिता (देव) एकच आहे. आपल्यातील प्रत्येकाला एकाच देवाने निर्माण केले आहे. मग लोक आपल्या भावांनाच का फसवितात? ते लोक कराराचा मान ठेवीत नाहीत. आमच्या पूर्वजांनी देवाशी केलेल्या कराराचा ते मान राखत नाहीत.
मलाखी 2:10 -
परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना पुरूष व स्त्री असे निर्माण कोले.
मार्क 10:6 -
कारण त्या दिवासात जो त्रास होईल तो देवाने जग निर्माण केले त्या आरंभापासून तो आजपर्यंत कधीही झाला नसेल व पुन्हा त्यासारखा कधीही होणार नाही, असा असेल.
मार्क 13:19 -
त्याच्याद्वारे (शब्दाच्या) सर्व काही निर्माण करण्यात आले त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही.
योहान 1:3 -
जगाच्या निर्मितीपासून देवाचे अदृश्य गुण, त्याचे सनातन सामर्थ्य व त्याचे देवपण हे देवाने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्यावरुन प्रगट होतात. आणि जर तुम्हांला हे कळत नाही, तर ह्याचे तुम्हांला कसलेच समर्थन करता येणार नाही. कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंत;करणे अंधकारमय झाली. जरी गर्वाने त्यांनी स्वत:ला शहाणे समजले तरी ते मूर्ख ठरले. आणि अविनाशी देवाचे गौरव याची मर्त्य मानव, पक्षी, चार पायाचे प्राणी, सरपटणारे प्राणी यांच्यासारख्या दिसणाऱ्या प्रतिमांशी अदलाबदल केली. यासाठी देवाने त्यांना त्यांच्या मनातील वाईट वासनांच्या व वैषयिक अशुद्धतेमुळे सोडून दिले आणि त्यांनी एकमेकांच्या देहाचा अनादर करावा यासाठी त्यांस मोकळीक दिली. त्यांनी देवाच्या खरेपणाशी लबाडीची अदलाबदल केली व निर्माणकर्त्याऐवजी जे निर्मिलेले त्याची उपासना केली. निर्माणकर्ता सर्वकाळ धन्यवादित आहे. आमेन.
रोमकरांस 1:20-25 -
कारण निर्माण केलेले जग पुत्राच्या प्रगट होण्याच्या काळाची वाट पाहत आहे. निर्माण केलेले जग सर्व स्वाधीन होते ते इच्छेने नव्हे तर देवाने ते अधीन ठेवले होते म्हणून, या आशेने की, निर्माण केलेले जग त्याच्या अशुद्धतेच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, व देवाच्या मुलांचे वैभवी गौरव त्याने उपभोगावे. कारण आपल्याला माहीत आहे की, आजपर्यंत, निर्माण केलेले संपूर्ण जग कण्हत,वेदना भोगीत आहे.
रोमकरांस 8:19-22 -
आणि मनुष्य स्त्रीकरिता निर्माण केला गेला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण केली गेली.
1 करिंथकरांस 11:9 -
कारण आम्ही देवाच्या हाताने घडविलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आम्हांला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अगोदरच तयार केले होते. यासाठी की, त्यामध्ये चालणे आम्हांला शक्य व्हावे.
इफिसकरांस 2:10 -
कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व काही त्याच्या सामर्थ्याने निर्माण केले गेले. जे काही दृश्य आहे आणि जे काही अदृश्य आहे, सिंहासने असोत किंवा सामर्थ्य असो, सत्ताधीश असोत किंवा अधिपती असोत सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण केले गेले.
कलस्सैकरांस 1:16 -
मूलभूत शिक्षण जे ख्रिस्तापासून नाही व मनुष्यांनी हस्तांतरित केले आहे त्या मानवी तत्त्वज्ञानाने व पोकळ फसव्या कल्पनांनी तुम्हांला कोणीही कैद्यासारखे घेऊन जाऊ नये म्हणून सावध असा.
कलस्सैकरांस 2:8 -
आणि तुम्ही नवीन मनुष्य धारण केला आहे. हे नवे रुप त्याच्या निर्माणकर्त्याच्या प्रतिमेप्रमाणे सतत नवे होत जाते. यासाठी की या नव्या मनुष्याला देवाचे पूर्ण ज्ञान मिळावे.
कलस्सैकरांस 3:10 -
ते लोकांना लग्न करण्यास मना करतात व काही अन्रपदार्थ टाळण्यासाठी सांगतात. जे विश्वासणारे आहेत, व ज्यांना सत्य माहीत आहे अशांनी उपकार मानून घेण्यासाठी देवाने ते निर्माण केले आहेत.
1 तीमथ्याला 4:3 -
आणि देव असेही म्हणाला, “हे प्रभु, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे.
इब्री लोकांस 1:10 -
आता विश्वास म्हणजे, आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरंवसा असणे. यासाठीच म्हणजे त्यांच्या विश्वासासाठीच देवाने पूर्वीच्या लोकांना उंचावले होते. विश्वासामुळेच आम्हांला समजते की, या जगाची निर्मिती देवाच्या आज्ञेने झाली. म्हणून जे काही आता दिसते ते जे दिसत नव्हते त्यापासून निर्माण केले गेले.
इब्री लोकांस 11:1-3 -
पहिल्यांदा आम्ही जे तुम्हाला सांगितले तेतुम्ही समजून घेतले पाहिजे, ते म्हणजे, शेवटच्या दिवसांत थट्टेखोर लोक येतील जे आपल्या इच्छेप्रमाणे वागतील. आणि म्हणतील, “ख्रिस्ताच्या येण्याविषयीच्या अभिवचनाचे काय झाले? आम्हाला ते जाणून घ्यायचे आहे, कारण आमचेपूर्वज मेल्यापासून प्रत्येक गोष्ट जगाच्या निर्मितीच्या पासून जशी चालत आली तशीच ती आजसुद्धा घडत आहे.” पणजेव्हा ते असे म्हणतात, तेव्हा ते मुद्दामच विसरतात की, फार पूर्विपासून आकाश व पृथ्वी अस्तित्वात होती, जी देवाच्याशब्दाने पाण्यामधून आकारास आली. जेव्हा मागे जग अस्तित्वात होते तेव्हा याच घटकणेमुळे महापूर येऊन पृथ्वीचा नाशझाला.
2 पेत्र 3:3-6 -
“लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही:“जो आमेनआहे, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.
प्रकटीकरण 3:14 -
“आमचा प्रभु आणि देव! तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्तकरुन घेण्यास योग्य आहेस. तू सर्व काही तयार केलेसतुला वाटत होते म्हणून सर्व काही अस्तित्वात आले आणि करण्यात आले.”
प्रकटीकरण 4:11 -
जो अनंतकाळजगतो, ज्याने आकाश व त्यातील सर्व काही बनविले, पृथ्वी व तीवरील, त्याच्या नावाने शपथ वाहिली. आणि म्हणाला,“आता आणाखी विलंब होणार नाही!
प्रकटीकरण 10:6 -
मग मी आणखी एक देवदूत हवेत उंच उडताना पाहिला. पृथ्वीवरील लोकांना सांगण्यासाठी म्हणजे प्रत्येक राष्ट्राच्या,वंशाच्या, भाषेच्या आणि जमातीच्या लोकांना सांगण्यासाठी त्या देवदूताकडे अनंतकाळचे शुभवर्तमान होते. देवदूत मोठ्याआवाजात म्हणाला, “ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र, व पाण्याचे झरे निर्माण केले, त्या देवाचे भय धरा आणि त्याचीस्तुति करा. देवाने न्याय करावा अशी वेळ आली आहे. देवाची उपासना करा.”
प्रकटीकरण 14:6-7