सरंक्षण


 • माझ्या विधी नियमांची आठवण ठेवून ते पाळा! म्हणजे मग तुम्ही आपल्या देशात सुरक्षित राहाल;
  लेवीय 25:18
 • बन्यामीन विषयी मोशे म्हणाला, “बन्यामीन परमेश्वराला प्रिय आहे. तो परमेश्वरापाशी सुरक्षित राहील. देव त्याचे सदोदित रक्षण करील. आणि परमेश्वराचे वास्तव्य त्याच्या प्रदेशात राहील.”
  अनुवाद 33:12
 • आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभो परमेश्वरा तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.”
  2 शमुवेल 7:29
 • मग त्याने दिमिष्कातील अरामात आपली ठाणी बसवली. हे अरामी लोकही दावीदाचे अंकित झाले आणि त्यांनी खंडणी आणली. दावीदाला परमेश्वराने तो जाईल तेथे यश दिले.
  2 शमुवेल 8:6
 • तुला मी सर्वत्र साथ दिली. तुझ्या पुढे जाऊन तुझ्या शंत्रूंचे पारिपत्य केले. आता मी तुला थोर लोकांच्या रांगेत नेऊन बसवणार आहे.
  1 इतिहास 17:8
 • राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे, सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला निराश करणार नाही. देवा, तू तुझ्या सर्व शंत्रूना तू किती सामर्थ्यवान आहेस ते दाखवशील. तुझ्या सामर्थ्याने तुझा तिरस्कार करणाऱ्यांचा पराभव होईल. भट्टीतली आग अनेक वस्तू जाळू शकते. परमेश्वरा, तू जेव्हा राजाबरोबर असतोस तेव्हा तो भट्टीसारखा असतो. त्याचा क्रोध अग्रीसारखा जळतो आणि तो त्याच्या शत्रूंचा नाश करतो.
  स्तोत्रसंहिता 21:7-9
 • परंतु राजा त्याच्या देवाबरोबर आनंदात असेल आणि ज्या लोकांनी त्यांच्या आज्ञा पाळायचे वचन दिले ते त्याची स्तुती करतील का? कारण त्याने त्या खोटे बोलणाऱ्यांचा पराभव केला.
  स्तोत्रसंहिता 63:11
 • मी या जागेवर दावीदाला बलवान बनवीन. मी माझ्या निवडलेल्या राजाला दिवा देईन. मी दावीदाच्या शत्रूंना लाजेने झाकून टाकीन परंतु मी दावीदाचे राज्य वाढेल असे करीन.”
  स्तोत्रसंहिता 132:17, 18
 • परमेश्वर राजांना त्यांच्या लढाया जिंकायला मदत करतो. परमेश्वराने त्याचा सेवक दावीद याला त्याच्या शत्रूंच्या तलवारीपासून वाचवले.
  स्तोत्रसंहिता 144:10
 • देव सनातन आहे. तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्वकाळ चालते!. तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. ‘शत्रूंना नष्ट कर’ असे तो म्हणतो.
  अनुवाद 33:27
 • मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो का? कारण परमेश्वरा, तू मला सुरक्षित ठेवून झोपवतोस.
  स्तोत्रसंहिता 4:8
 • मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही.
  स्तोत्रसंहिता 16:8
 • परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो. परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो.
  स्तोत्रसंहिता 34:7
 • देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे. आम्ही संकटकाळी त्याच्याजवळ नेहमीमदत शोधू शकतो.
  स्तोत्रसंहिता 46:1
 • का? कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता. परात्पर देवाला तुम्ही तुमची सुरक्षित जागा बनवले आहे. तुमचे काहीही वाईट होणार नाही. तुमच्या घरात रोगराई असणार नाही.
  स्तोत्रसंहिता 91:9, 10
 • जर परमेश्वर घर बांधीत नसेल तर ते बांधणारे लोक त्यांचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत. जर परमेश्वर शहरावर नजर ठेवीत नसेल तर पहारेकरी त्यांचा वेळ वाया घालवीत आहेत.
  स्तोत्रसंहिता 127:1
 • जो परमेश्वराचा आदर करतो तो सुरक्षित असतो आणि त्याची मुलेही सुरक्षितपणे जगतात.
  नीतिसूत्रे 3:26
 • जो परमेश्वराचा आदर करतो तो सुरक्षित असतो आणि त्याची मुलेही सुरक्षितपणे जगतात.
  नीतिसूत्रे 14:26
 • परमेश्वराच्या नावात खूप शक्ती आहे. तो बळकट बुरुजाप्रमाणे आहे. चांगले लोक त्यांच्याकडे जाऊ शकतात आणि सुरक्षित होतात.
  नीतिसूत्रे 18:10
 • लोक युध्दासाठी घोड्यांसकट सर्व तयारी करु शकतात, पण परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिल्याखेरीज ते युध्द जिंकू शकत नाहीत.
  नीतिसूत्रे 21:31
 • देवाने म्हटलेला प्रत्येक शब्द परिपूर्ण असतो. जे लोक देवाकडे जातात त्यांच्यासाठी देव म्हणजे एक सुरक्षित जागा असते.
  नीतिसूत्रे 30:5
 • प्रभू माझा परमेश्वर कदाचित् काही करायचे निश्चित करील, पण तसे करण्यापूर्वी, तो, आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्ट्यांना सागेल.
  आमोस 3:7
 • देवाने दिलेले संपूर्ण चिलखत धारण करा. यासाठी की तुम्हांला सैतानाच्या दुष्ट योजनांविरुद्ध उभे राहता यावे. कारण आपले झगडणे, रक्तमांसाबरोबर नाही, तर सताधीशांविरुद्ध, अधिकान्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या सामर्थ्याबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्यांविरुद्ध आहे.
  इफिसकरांस 6:11, 12