क्षमाशीलता


  • कारण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिताही तुम्हांला क्षमा करील; पण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.
    मत्तय 6:14, 15
  • नंतर येशू म्हणाला, “हे बापा, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.”त्यांनी चिठ्ृया टाकून त्याचे कपडे वाटून घेतले.
    लूक 23:34
  • अति जुन्या व उत्तम ग्रीक प्रतीमध्ये ही वचने नाहीत)
    योहान 8:11
  • “मी, आणि फक्त मीच तुझी पापे धुतो. मी हे माझ्या आनंदासाठी करतो. मी तुझी पापे लक्षात ठेवणार नाही.
    यशया 43:25
  • जे दयाळू ते धन्य, कारण त्यांचावर दया करण्यत येईल.
    मत्तय 5:7
  • कारण मी दयाळूपणे यापुढे त्यांचे अपराध माफ करीन. त्यांची पापे विसरून जाईन.”
    इब्री लोकांस 8:12
  • नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, ‘जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? मी त्याला सात वेळा क्षमा करावी काय?” येशूने उत्तर दिले, ‘मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर 77 वेळाअन्याय केला तरी तू त्याला क्षमा करीत राहा.”
    मत्तय 18:21, 22
  • जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देवविश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो.
    1 योहान 1:9
  • आणि देवाने आमची पापे पूर्व आणि पश्चिम एकमेकींपासून जितक्या अंतरावर आहेत तितक्या अंतरावर नेऊन ठेवली.
    स्तोत्रसंहिता 103:12
  • लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरुन जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वत:सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे!
    लेवीय 19:18
  • परमेश्वरा, जर एखादा माणूस तुझ्यावर खरोखरच प्रेम करत असेल तर तू त्याला तुझे खरे प्रेम दाखवशील. जर एखादा माणूस तुझ्याशी खरा वागला तर तू देखील त्याच्याशी खरा वागशील.
    स्तोत्रसंहिता 18:25
  • प्रभु, तू चांगला आणि दयाळू आहेस. तुझी माणसे तुला मदतीसाठी हाका मारतात, तू त्या माणसांवर खरोखरच प्रेम करतो.
    स्तोत्रसंहिता 86:5
  • प्रेम करणे कधी सोडू नकोस. नेहमी इमानदार आणि प्रामाणिक राहा. या गोष्टी तुझाच एक घटक बनव. त्यांना तुझ्या मानेभोवती बांध. त्या गोष्टी तुझ्या हृदयावर कोर. म्हणजे तू शहाणा होशील व देवाला व लोकांना तुझ्याबद्दल आनंद वाटेल.
    नीतिसूत्रे 3:3, 4
  • जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपला भाऊ अगर बहीण यांना क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.”
    मत्तय 18:35
  • मग येशू म्हणाला, “हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभु मी तुझे उपकार मानतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धिमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या
    मार्क 11:25
  • ʇदुसऱ्यांचा न्याय करु नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला दोषी ठरविले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल.
    लूक 6:37
  • एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा. आणि देवाने ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.
    इफिसकरांस 4:32
  • एकमेकांचे सहन करा. जशी प्रभुने तुम्हांला क्षमा केली तशी एखाद्याविरुद्ध तक्रार असेल तर एकमेकांना क्षमा करा.
    कलस्सैकरांस 3:13
  • कोणीही देवाची कृपा चुकवू नये, यासाठी तिकडे लक्ष द्या आणि इकडे लक्ष द्या की, कोणतेही कडूपणाचे मूळ वाहून त्यापासून समस्या निर्माण होऊ नये व इतर लोकांची मने कलुषित करू नये, म्हणून जपा.
    इब्री लोकांस 12:15